शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

सैैनिकांना शाखांचे दरवाजे बंद

By admin | Published: May 21, 2016 3:41 AM

ठाणे शहराची ओळख टपऱ्यांचे शहर म्हणून वाढू लागल्यानंतर ती पुसून टाकणाच्या प्रयत्न माजी आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी केला

घोडबंदर : ठाणे शहराची ओळख टपऱ्यांचे शहर म्हणून वाढू लागल्यानंतर ती पुसून टाकणाच्या प्रयत्न माजी आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी केला होता.मात्र, त्यांनी अनेक रस्त्यांवर पुन्हा डोके वर काढल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रस्ता रु ंदीकरण मोहिमेत केवळ टपऱ्याच नव्हे तर दुकाने, घरे,गाळे भुईसपाट झाले आहेत. याचा फटका राजकीय पक्षांच्या कार्यालयांनाही बसला असून शिवसेनाही सुटलेली नसून पोखरण रोड-२ वरील तीन,कळवा नाक्यावरील जुनी शिवसेना शाखा जमीनदोस्त झाल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांना शाखेचे दरवाजे बंद झाले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत राजकीय कार्यालये हटवण्याचे आदेश देऊनही ती हटवताना अडथळे येत होते. ते काम आयुक्तांच्या रस्ता रु ंदीकरण मोहिमेत फत्ते झाले आहे. जयस्वाल यांनी शहराचा चेहरा बदलताना रस्त्यांना प्राधान्य दिले. त्यांच्या आदेशाने प्रथम घोडबंदर सर्व्हिस रोडवर २३ नोव्हेंबर २०१५ रोजी मोहीम सुरू करून १०० बांधकामे दूर केली. त्यावेळी स्थानिक शाखाप्रमुखाने केलेला विरोध मोडून काढला. १३ व १४ जानेवारीला पोखरण रोड-१ वर कारवाई करून दुमजली दोन इमारतींसह ७८० बांधकामे तोडली. २ फेब्रुवारी बाळकुम रस्त्यातील ५०, तर २३ फेब्रुवारी रोजी बुधाजीनगर ते कळवा स्टेशनवरील ७२ झोपड्या,दोन इमारती,२ मार्च ठाणे स्टेशन रोडमधील ४५५ बांधकामे,२२ मार्चला मखमली तलाव ते खोपट,हरिनिवास येथील १४० वाढीव बांधकामे काढली.६ एप्रिलपासून कारवाईचा वेग वाढल्यानंतर कापूरबावडी नाक्यावरील तीन इमारती, १२ एप्रिल उथळसर, टिकुजिनीवाडी येथील १२५,पोखरण रोड-२ वर २५ एप्रिलला कारवाई करून ८०० बाधितांवर कारवाई झाली.२८ एप्रिलला तीनहातनाका येथील १३२ गाळे तोडले. मुंब्रा येथे तीन दिवस चाललेल्या कारवाईत एकूण २ हजार ४०१ बांधकामे काढली. १२ व १३ मे रोजी कळव्यात कारवाई झाली. त्यात ४०० बांधकामे हटवली. शास्त्रीनगरमध्ये दोन दिवस कारवाई करून ३८२ अतिक्र मणांवर हातोडा पडला. एकूण ५ हजार ९१२ बांधकामांसह सात इमारतींवर आतापर्यंत कारवाई झाली. पोखरण १ व २,कळवा येथे कारवाई शिल्लक आहे.त्यामुळे अतिक्र मण संख्या वाढणार आहे.राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कळवा नाक्यावरील कार्यालय तोडताना तेथील शिवसेनेची जुनी शाखाही तोडली. पोखरण रोड-२ वर सुभाषनगर, गांधीनगर शाखा तोडल्या असून कोकणीपाडा येथील शाखादेखील रस्त्यात येत असल्याने तिच्यावर हातोडा पडणार आहे.