जळगाव : अनेक वर्षांपासून अयोध्येत राममंदिर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे काम मुळीच करू शकत नाहीत. राममंदिर हे केवळ संत-महंतच उभारू शकतात, असा दावा द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सोमवारी येथे केला. राममंदिर बांधणे हे आमचे स्वप्न असून, लवकरच ते सत्यात उतरविणार आहोत़ त्यासाठी राजकीय पक्षांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही, असेही स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. अयोध्या येथील राममंदिरात मशीद होती याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे तेथे केवळ राममंदिर व्हावे, यासाठी आम्ही काम करीत आहोत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळ््यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे. कुंभमेळ््याचे नियोजन चांगले होते. सिंहस्थात एकत्र आलेल्या सनातन धर्मीयांनी एकतेचा संदेश दिला, असेही त्यांनी सांगितले.राज्यात गोहत्या बंदी करण्यात आली. ती देशभरात होणे गरजेचे आहे. सत्तेसाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये होणारी भांडणे थांबविली पाहिजे. हिंदू धर्मात राम, कृष्ण असे विविध देव, देवता असताना साईबाबांची गरज काय, असा सवालही केला. (प्रतिनिधी)गोदामाईला शुद्ध करण्याची गरज काय ? कुंभमेळ््यातील पर्वणी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवरातील तीर्थ गोदावरी नदीत टाकले. गोदावरी नदी ही पवित्र व शुद्ध आहे. हे तीर्थ आणून तिला शुद्ध करण्याची काहीही गरज नव्हती, असे सांगत स्वरूपानंदांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली.व्यक्ती धर्मनिरपेक्षराहूच शकत नाही ! सनातनवर बंदी हवी की नको, या प्रश्नावर ते म्हणाले की, सरकार हे धर्मनिरपेक्ष राहील; मात्र व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. सनातन संस्था काय आहे, हे माहीत नाही. मात्र आम्ही सनातन आहोत. विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतच उभारणार राममंदिर !
By admin | Published: October 06, 2015 2:36 AM