ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला क्लीनचीट दिल्यानंतरही विशेष एनआयए कोर्टाने साध्वी प्रज्ञाचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांना जामीनासाठी पुन्हा अर्ज दाखल करावा लागणार आहे.
आणखी बातम्या :
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने साध्वीसह अन्य तिघांविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळले, तसेच सर्व आरोपींवरील मोक्का हटवला. त्यामुळे साध्वीने विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, तिच्या जामीन अर्जाला विरोध करणारा मध्यस्थी अर्ज बॉम्बस्फोटातील एका पीडिताने दाखल केला, तर तिची जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी दीपक पारेख यांनीही मध्यस्थी अर्ज दाखल केला.
मात्र आज झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.