शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

खूशखबर! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 8:00 PM

वेतनासाठी एसटी कर्मचारी संघटनांना करावा  लागला झगडा

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांना प्रत्येक एसटी कामगार संघटनेच्यावतीने पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच एप्रिल महिन्याचे मासिक वेतन कर्मचा-यांना देण्यासंबंधात एसटी महामंडळाकडुन योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत.

एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त ), महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस यांच्यावतीने  वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री,  परिवहन मंत्री, परिवहन राज्य मंत्री  यांना पत्रव्यवहार केला गेला होता.एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याबाबत राज्य शासनाकडे विविध सवलतींच्या प्रतिपुर्तीचा शिल्लक निधी मिळण्याबाबत महामंडळाकडुन  प्रस्ताव पाठवला गेला होता. तो निधी लवकरात लवकर मिळविण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरु होते. संघटनेच्या नेतृत्वाकडुन वेतन देण्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात होते.  या सर्व प्रयत्नांमुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच माहे एप्रिल महिण्याचे देय मासिक वेतन कर्मचा-यांना देण्यासंबंधात रा.प.महामंडळाकडुन योग्य त्या सुचना देण्यात येतील. एस टी कर्मचारी वेतनाचा तिढा एका महिन्यापूरता सुटलालॉकडाऊनमुळे लालपरी पूर्णतः बंद आहे.  उत्पन्न थांबल्याने 1लाख 7हजार कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण  राज्य सरकारने सवलतीची प्रतीपुर्ती असलेल्या  ५४७ लाख रकमेपैकी २५० कोटी एसटीला देऊ केल्याने एका महिन्या पुरता वेतनाचा तिढा सुटला आहे. ही रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यानी केली होती. लॉकडाऊन काळात अत्यंत बिकट परिस्थिती एसटीला सवलतीच्या थकबाकीची रक्कम देऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा  तिढा सोडविल्या बद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त करत आहोत

.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेसमहाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एसटी कर्मचा-यांचे वेतन एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्यात अदा करण्यासाठी राज्य सरकारने  विविध प्रवास सवलत मुल्यांच्या पुर्तीप्रतिपोटी दयावयाच्या रकमेसह एप्रिल या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी ३०० कोटी रूपये एस.टी. महामंडळास द्यावेत. जेणेकरुन एस.टी. कर्मचा-यांचे वेतन अदा होईल अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.  त्यानंतर महाराष्ट्र शासनाने विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीतून २५० कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे  एस.टी कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असून १ लाख ५ हजार कर्मचा-यांना वेतन मिळणार  आहे. 

- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) 

 

मान्यताप्राप्त संघटनेच्यावतीने एसटी कामगारांचे वेतन होणाऱ्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे  राज्य सरकारच्या निर्णयानुसार एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच एप्रिल महिन्याचे देय मासिक वेतन कर्मचा-यांना देण्यात येणार आहे. 

.- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्ट्रेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना 

टॅग्स :state transportएसटी