शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खाते आता खासगी बँकेत; एसटी महामंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 8:13 AM

आधीच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक आणखी अडचणीत येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एसटी महामंडळाने भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकांशिवाय कर्मचाऱ्यांना फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी बँकेसारख्या खासगी बँकेमध्ये वेतन खाते उघडण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आधीच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक आणखी अडचणीत येणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे बहुतांश व्यवहार स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून चालतात. पूर्वी एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये पगार खाते उघडणे बंधनकारक होते. मात्र, आता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पगार खाते उघडण्यास सूट दिली आहे. ज्यामध्ये भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेव्यतिरिक्त फेडरल बँक, एचडीएफसी बँक तसेच आयसीआयसीआय  बँकेमध्ये वेतन खाते उघडण्याचा सूचना एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याबाबत परिपत्रकसुद्धा काढण्यात आले आहे.

अशी आहे स्टेट ट्रान्सपोर्ट बँक

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक ही पगारदार आणि नोकरदाच्या बँकांमध्ये अग्रणीय बँक म्हणून गणली जात होती. बँकेच्या राज्यभरात ५२ शाखा आहेत तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. बँकेचे ८५ हजार एसटी कर्मचारी सभासद आहेत. त्यातील ३५,००० एसटी कर्मचारी बँकेचे खातेदार आहेत, त्यांचे येथून वेतन होते. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना भारतीय स्टेट बँकेमधून वेतन मिळते.

कर्जावरील व्याजाचा दर जास्त 

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजाचा दर ११. ४० टक्के आहे. तर इतर राष्ट्रीयीकृत किंवा खासगी बँकांचा कर्जावरील व्याजदर तुलनेत कमी आहे, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या एकूण कार्यपद्धतीबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाने इतर बँकांमध्ये वेतन खाते देण्यास परवानगी दिली. 

कर्ज घेतले असल्यास ना हरकत आवश्यक

ज्या  एसटी कर्मचाऱ्यांनी भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेमधून कर्ज घेतले आहे, त्यांना इतर बँकेत वेतन खाते उघडण्यापूर्वी संबंधित बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे इतर बँकेत बचत खाते आहे, त्यांना  तेच खाते वेतन खात्यात बदलता येऊ शकते.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेने कर्जाचे व्याजदर कमी न केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. इतर बँकांच्या स्पर्धेत उतरून या बँकेने व्याजदर ठेवायला हवा होता. आता इतर बँकेत वेतन खाते उघडण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने कर्मचारी त्यांचे वेतन इतर बँकेतून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :state transportएसटी