शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

संप मागे घेतला तरच पगारवाढ! अनिल परब यांचा इशारा; आतापर्यंत ११,५४९ कर्मचारी कामावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 6:16 AM

परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत चर्चा केली. या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतरही संप सुरू राहणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. सरकार चार पावले पुढे आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर यावे, असे आवाहन करतानाच संप मागे न घेतल्यास पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिला.परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत चर्चा केली. या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर ते म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण केल्याने आता संप मागे घ्यावा. एसटी सेवा बंद राहणे राज्याच्या हिताचे नाही. प्रवाशांची गैरसोय होते तसेच ते कर्मचाऱ्यांच्याही हिताचे नाही. विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. समिती जो अहवाल देईल तो सरकारला मान्य असेल.

बसेस धावल्या; प्रवाशांना दिलासाआतापर्यंत ११ हजार ५४९ कर्मचारी सेवेत परतले आहेत. त्यामध्ये प्रशासकीय विभागातील ६ हजार ९७३, कार्यशाळा ३ हजार ५४९, चालक ५९४ आणि वाहक श्रेणीतील ४३३ कर्मचारी कामगारांचा समावेश आहे. तर ३७ आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. सांगलीतील सर्वाधिक १० आगार सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध मार्गांवर ३१५ एसटी धावल्या. त्या माध्यमातून ९ हजार ५५१ प्रवाशांना सेवा देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

आर्थिक भार स्वीकारत राहायचे आणि त्याबदल्यात एसटी बंद ठेवायची, असे चालणार नाही. पगारवाढ देताना सरकारने वेतनाची हमी घेतली आहे. बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. सातवा वेतन आयोग लागू करा आणि चार वर्षांचा करार दहा वर्षांचा करा, अशा काही मागण्या चर्चेतून समोर आल्या आहेत. त्यावरही विचार करू शकतो. - अनिल परब

...तर कारवाईचा बडगापरब म्हणाले की,  मूळ वेतनात पगारवाढ दिली असल्याने त्यांच्या ग्रेडमध्ये काही तफावत निर्माण होऊ शकतात, असाही मुद्दा आजच्या बैठकीत आला. याबाबत कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही. कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगारांच्या वर जाणार नाही, याची काळजी घेऊ. - संप संपल्यावर जाचक अटींवर  विचार केला जाईल, पण कोणतीही बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही.- पगारवाढीच्या निर्णयानंतर कामगारांनी कामावर उद्या सकाळी हजर होण्याबाब मुदत मागितली. २ दिवसांत बऱ्यापैकी गाड्या सुरू होतील. - उद्या येणाऱ्या कामगारांना यायला परवानगी देऊ. पण, अशी सवलत सतत देणे शक्य नाही. अन्यथा कारवाईचा बडगा उभारू. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाEmployeeकर्मचारी