सचिन राऊत /अकोला: अपघातात किंवा मारहाणीच्या घटनांमध्ये मानवाच्या शरीराचा कोणताही भाग तुटल्यानंतर त्याला जोडण्यासाठी डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेत वापरण्यात येणार्या ह्यआर्थोपेडिक इनप्लांटह्ण (हाडांची जोडणी करणारे साहित्य) चा विनापरवाना गोरखधंद्याचा पर्दाफाश अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी रात्री उशिरा केला. यावेळी पाच लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले.जुन्या आरटीओ रोडवरील रामी हेरीटेजमधील तिसर्या माळय़ावरील एका फ्लॅटमध्ये नरेंद्र जाधव यांच्या मालकीच्या एस. जी. एंटरप्रायजेसमधून ह्यआर्थोपेडिक इनप्लांटह्ण ची विनापरवाना खरेदी-विक्री होत असल्याची गुप्त माहीती विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी धाड टाकली. यावेळी पथकाने फ्लॅटमधील एका खोलीतून सुमारे पाच लाख रुपयांचे साहीत्य जप्त केले. यामध्ये रॉड , स्क्रू आदी साहीत्याचा समावेश आहे. शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणार्या या साहित्याची एस.जी. एंटरप्रायजेसमधून गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी विक्री होत असल्याची माहीती वरीष्ठ अधिकार्यांनी दिली. कुठलीही अधिकृत परवानगी न घेता खरेदी विक्री होणार्या साहित्य हे वैद्यकीय निकष पूर्ण करणारे होते का? जर ते पूर्ण करत नसतील तर या साहित्याच्या विक्रीमुळे अनेक रुग्णांच्या जिवाशी खेळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक डॉ. प्रशांत अस्वार आणि औषध निरीक्षक गजानन घिरके यांनी केली.- एस. जी. एंटरप्रायजेसमधून विनापरवाना ह्यआर्थोपेडिक इनप्लांटह्णची खरेदी-विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून कारवाई केली. सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला.महाराष्ट्रातील मोठी कारवाईअन्न व औषध प्रशासन विभागाकडून विनापरवाना ह्यआर्थोपेडिक इनप्लांटह्ण खरेदी विक्रीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश करुन कारवाई करण्याची ही पहिलीच घटना आहे. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचेही सुत्रांनी सांगतिले. सखोल चौकशी करणार !विनापरवानगी साहित्य विक्री करणार्या एस.जी. एंटरप्रायजेसद्वारे आतापर्यंत कुठल्या रुग्णालयांना साहित्याचा पुरवठा करण्यात आला, त्याची सखोल चौकशी करुन संबंधीत डॉक्टरांचे नरेंद्र जाधवशी काही लागेबांधे आहेत का, त्यांच्याकडे असलेल्या देयकाचीही माहीती घेतली जाणार आहे. या कारवाईमुळे वैद्यकिय वतरुळात खळबळ उडाली आहे. म्हणे परवाना लागतो कशाला?अन्न व औषध प्रशासन विभागाने एस. जी. एंटरप्रायजेस येथे छापा टाकल्यानंतर या एंटरप्रायजेसच्या संचालकाने अधिकार्यांना सदर ह्यआर्थोपेडीक इनप्लांटह्णची खरेदी-विक्री करण्यासाठी परवाना लागतोच कशाला, असा उलट सवाल केला. या सवालानंतर चौकशी पथकाने जाधवची चांगलीच खरडपट्टी काढली !
‘आर्थोपेडिक इनप्लांट’ विक्रीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश !
By admin | Published: February 14, 2017 1:47 AM