मुंबई : प्रदीप जैन खूनप्रकरणी दोषी आढळलेला गँगस्टर अबू सालेम, मेहंदी हसन व वीरेंद्र यांची शिक्षा येत्या बुधवारी विशेष टाडा न्यायालय जाहीर करणार आहे़विशेष न्यायाधीश जी़ ए़ सानप यांच्यासमोर हा खटला सुरू आहे़ या खुनासाठी न्यायालयाने दोषी धरल्यानंतर सरकारी व बचाव पक्षाने या आरोपींच्या शिक्षेसाठी युक्तिवाद केला़ सरकारी पक्षाने सालेम व मेहंदीला फाशी शिक्षा ठोठवावी, अशी मागणी आधी केली होती़ नंतर सालेमसाठी जन्मठेपेची मागणी सरकारी पक्षाने केली़ तर सालेमची शिक्षा पोर्तुगालसोबत करार झालेल्या वर्षांपासून म्हणजेच २००२ पासून मोजावी, अशी विनंती बचाव पक्षाने केली़ त्यामुळे सालेमला किती शिक्षा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ जुहू येथील बंगल्याबाहेर जैन यांची १९९५ मध्ये गोळ्या झाडून हत्या झाली़ यासाठी विशेष टाडा न्यायालयाने सालेमसह हसन व वीरेंद्रकुमार यांना दोषी धरले आहे़ (प्रतिनिधी)
सालेमचा फैसला बुधवारी
By admin | Published: February 24, 2015 4:15 AM