शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

स्मार्ट कार्डमध्ये फेरफार करून रेल्वेच्या दिड लाखांच्या तिकिटाची विक्री

By admin | Published: July 14, 2016 5:32 PM

तिकिट खिडकीवरील रांगेतून प्रवाशांना मुक्ती मिळावी या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकावर बसविण्यात आलेल्या स्वंयचलित तिकिट मशिन ( आॅटोमेटीक तिकिट वेंडीग मशिन)च्या स्मार्ट कार्ड मध्ये

पुणे : तिकिट खिडकीवरील रांगेतून प्रवाशांना मुक्ती मिळावी या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकावर बसविण्यात आलेल्या स्वंयचलित तिकिट मशिन ( आॅटोमेटीक तिकिट वेंडीग मशिन)च्या स्मार्ट कार्ड मध्ये फेरफार करून एकाच दिवशी तब्बल 1 लाख 63 हजार रूपयांच्या तिकिटांची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी औरंगाबाद येथील 62 वर्षीय राधेशाम अग्रवाल या व्यक्तीस रेल्वे सुरक्षादलाने अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 22 स्मार्ट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. बुधवारी (दि.13) रोजी रात्री सापळा रचून या आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुणे रेल्वे स्थानकांवरील तिकिट खिडक्यांवर मोठया प्रमाणात रांगा असल्याने लोकल तसेच पँसेंजर गाडयांचे तिकिट काढणा-या प्रवाशांना अनेकदा तासंतास रांगेत ताटकळत थांबावे लागते, तसेच अनेकदा या रांगेमुळे गाडीही सोडावी लागते. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून या ठिकाणी स्वयंचलित तिकिट मशिन बसविण्यात आले आहे. या मशिन मध्ये कॉईन तसेच रोख रक्कम टाकूनही तिकिट काढता येते. तसेच रेल्वे कडून रिचार्ज करून देण्यात येणारे स्मार्ट कार्ड वापरूनही या मशिन मधून तिकिट काढता येते. अगरवाल यांनी रेल्वेचे हे स्मार्ट कार्ड घेतलेले असून त्यावर तिकिट काढण्याची मर्यादा एक हजार रूपयांपर्यंत आहे. त्यापेक्षा जास्त तिकिट त्यांना काढता येत नाहीत. मात्र, अगरवाल यांनी आपल्या कार्डामध्ये फेरफार करून 3 जुलै रोजी लाखो रूपयांच्या तिकिटांची विक्री स्थानकारवर केली आहे. या मशिन मधून दरदिवशी सरासरी 20 ते 22 हजार रूपयांची तिकिटे काढली जातात. मतर, त्या दिवशी एकदम तब्बल 1 लाख 63 हजार रूपयांची तिकिटे काढल्याचे आढळून आले. एकदम या तिकिट विक्रीचा संशय आल्याने पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक गौरव झा आणि मदनलाल मिनल यांनी काही कर्मचा-यां़च्या मदतीने या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यात काल रात्री अग्रवाल हा तिकिट विक्री करतानाच आढळून आला. त्यानंतर तत्काळ या आरोपीस रेल्वे सुरक्षादलाच्या ताब्यात देण्यात आले. मिरजमध्ये बोगस टीटीईला अटक अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी मिरज रेल्वे स्थानकावर बनावट तिकिट तपासणीस पुणे विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून पकडले आहे. ओमप्रकाश गुप्ता ( वय 62 वर्षे )रा. लखनऊ असे या आरोपीचे नाव असून रेल्वे मध्ये तिकिट नसलेल्या प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचे प्रकार हा आरोपी गेल्या काही महिन्यांपासून करत होता.