शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

सलील कुलकर्णी लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत रसिकांसमोर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 10:07 PM

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले असून वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाद्वारे ते लेखक- दिग्दर्शकाच्या भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहेत. 

ठळक मुद्देयेत्या आॅक्टोबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रत्यक्ष सुरूवातरसिकांच्या चेह-यावर स्मित हास्य यावे अशा विनोदी ढंगामधून चित्रपटाची मांडणी करण्यात येणार

पुणे : गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. साचेबद्ध चौकटींना छेद देत सातत्याने निरनिराळ्या गोष्टी करण्याचा ध्यास घेतलेले  सृजनशील आणि प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले असून,वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाद्वारे ते लेखक- दिग्दर्शकाच्या भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहेत. लोकप्रिय परीक्षक, संगीत गुरु ,त्याचप्रमाणे मधली सुट्टीसारख्या कार्यक्रमाचे संकल्पनाकार तसेच लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी याद्वारे लेखक अशा अनेक त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आयुष्यावर बोलू काही चा १५०० हून अधिक कार्यक्रमांचा विक्रम तसेच ज्येष्ठ संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर मैत्र जीवांचे हा जगभरात सादर झालेला कार्यक्रम ही त्यांच्या प्रतिभेला मिळालेली एक विशेष दाद आहे. याच रसिकांच्या प्रेम आणि आशीर्वादावरच ते आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अभिनव पाऊल टाकत आहेत. या नव्या भूमिकेविषयी लोकमतशी बोलताना प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी म्हणाले, गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जे काही केले ते नक्कीच वेगळे केले.अगदी बालगीतांपासून,अभंग आणि अभिजात कवितांपासून लावणीपर्यंत सर्व प्रकारची गाणी रसिकांना दिली आणि त्यांनीही त्या सर्वच गीतांना भरभरून प्रतिसाद दिला. आता आणखी एक नवी वाट चोखाळत आहे. गेल्या दोन वर्षामध्ये म्युझिक व्हिडिओ चे दिग्दर्शन केले असल्यामुळे  कॅमेरा,एडिटिंग, ट्रॉलीचा वापर याची थोडीफार जाण होतीच पण चित्रपटाचे दिग्दर्शन ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असल्याने त्या फॉर्मचा अभ्यास केला. आपल्या आसपास घडणा-या गोष्टी आणि असलेली पात्र अशी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटामधून मी मांडत आहे. लेखनही अशाच पद्धतीने केले आहे की सगळ्यांना ती स्वत:ची गोष्ट वाटेल आणि प्रत्येक जण त्याच्याशी रिलेट होईल. ही कथा ज्यांना ज्यांना ऐकवली त्यांच्या ती पसंतीस उतरली आणि त्यांनी  ह्यहिरवा कंदिलह्ण दिला. या गोष्टीत तू हयूमर मांडला आहेस, ती जर दुस-या कुणा दिग्दर्शकाच्या हातात दिलीस तर ती लाऊड होईल असा सल्ला अनेकजणांनी दिल्यामुळे स्वत:च या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. पु.ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीला मी आदर्श मानतो. रसिकांच्या चेह-यावर स्मित हास्य यावे अशा विनोदी ढंगामधून चित्रपटाची मांडणी करण्यात येणार आहे.  पात्रांची निवडही झाली असून येत्या आॅक्टोबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रत्यक्ष सुरूवात होईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcinemaसिनेमाmusicसंगीत