डोंबिवली:कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे सोमवारी भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील डॉक्टर विनय कुमार सचान यांच्या स्मारकाचा जवळ पुष्प अर्पण करून शहिदांना मानवंदना वाहण्यात आली. 26 जुलै 1999 हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो, भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे तत्कालीन दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळीही भाजप सरकारने पाकिस्तानला मान खाली घालण्यास भाग पाडले, त्या कारगिल युद्धामध्ये आपले बरेच जवान शहीद झाले अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले होते, परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले त्या सर्व आपल्या देशातील शहिदांना मनपूर्वक मानवंदना देण्यात आल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले.
त्या उपक्रमाला भाजपचे प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, पुनम पाटील ,मनिषा केळकर, नगरसेवक राहुल दामले, विशू पेडणेकर, निलेश म्हात्रे, विनोद कालन, संदीप पुराणिक, खुशबू चौधरी,प्रमिला चौधरी,पदाधिकारी संजू बिडवाडकर , संजय कुलकर्णी सुरेश पुराणिक युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश पेणकर यांच्यासह आबालवृद्ध नागरीक उपस्थित होते.