शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सांबा, असरानी, बसंती आणि आलिया !

By admin | Published: June 26, 2016 2:53 AM

महेश भट आणि त्यांची सुकन्या आलिया भट यांच्यात न झालेला संवाद ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दाखवायचे ठरले होते. पण अरविंद जगताप वगळता दुसऱ्या कोणालाही विनोद कळत नाहीत, असे मत डॉ. नीलेश

- अतुल कुलकर्णी

(महेश भट आणि त्यांची सुकन्या आलिया भट यांच्यात न झालेला संवाद ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दाखवायचे ठरले होते. पण अरविंद जगताप वगळता दुसऱ्या कोणालाही विनोद कळत नाहीत, असे मत डॉ. नीलेश साबळेंनी मांडल्यामुळे त्या संवादाचे कागद भेळेच्या पुडीत आले होते. भेळ खाऊन झाल्याने बाबूराव संवाद वाचत बसले होते...)आलिया : डॅडी, डॅडी, हू इज निजाम, आणि त्याची बिर्याणी खाऊन बोन पीस मोडतात म्हणजे काय... व्हॉटीज धीस डॅड...डॅड : तू कुठे वाचलं हे सगळं माझे आई?आलिया : डॅड, कोणत्या आईबद्दल बोलतोय तू... आणि आपल्या ड्रायव्हरकाकाने वडापावचा बर्गर आणला होता पेपरमध्ये गुंडाळून... त्या पेपरमध्ये हे सगळं प्रिंट केला होता... तो पेपर आहे ना अजून माझ्याकडे. बर्गरचा आॅईल तो पेपर चांगला सोक करतो म्हणून मी तो पेपर जपून ठेवला होता. मी वाचते. यू लिसन... ‘‘सम माधव भांडारी सेज, निजामची बिर्याणी खायची आणि त्यांचे नावँने बोटे मोडायची, यात कसली आलीय सच्चाई?’’ डॅड : आलिया, तू डोक्यावर पडलीयस का?आलिया : अय्या डॅड, तुला कसं कळलं... मी काल बेडवरुन डोक्यावर पडले? पण खाली आपला पपी होता. त्यामुळे मार नाही लागला. पण ते इंम्पॉरटंट नाहीय आत्ता... आधी मला सांग, बिर्याणी खाऊन बोटं मोडतात मीन्स काय?(खूप विचार करुन शब्दांची मनातल्या मनात जुळवाजुळव करुन शेवटी डॅडी सांगू लागतात...)डॅड : आलिया, इटस् पॉलीटिक्स... सच्चाई नावाचा एक रायटर आहे, तो भाषण करताना मोदी सरकारला निजाम बोलला, त्यावर मोदी सरकारचा मॅन त्यांना म्हणाला, तुम उसी निजामकी बिर्याणी खाते हो, आणि त्यांच्याच नावाने बोटं मोडता हे बरोबर नाही...आलिया : डॅड, मोदी मीन्स तेच ना, जे आधी चायवाला होते, नंतर पीएम झाले... डॅड : मला तुझ्याबद्दल प्राऊड वाटतो बेटा. ग्रेट...आलिया : बट डॅड, त्यांनी आता चाय सोडून बिर्याणी पकवणं सुरु केलंय..? आणि त्यांची बिर्याणी खाताना बोटं मोडतात म्हणजे बोन पीस आर नॉट प्रॉपरली कुक्ड... अ‍ॅम आय राईट?डॅड : अगं बाई, तुला मी कसं सांगू... तुझ्या डोक्यात काय बटाटे भरलेत का... आलिया : डॅडी, बटाटे होते ना त्या वडापाव बर्गरमध्ये... बट बिर्याणी खाताना बोन कशी मोडली ते सांगा ना.डॅड : तू शोले सिनेमा पाहिलास का?आलिया : येस्स डॅड, पाहिला ना...डॅड : त्यातला असरानी माहितीय का तुला... तो आधे ईधर, आधे उधर... बाकी मेरे पिछे आओ... म्हणत असतो. आणि त्याच्या मागे कोणीच नसतं.आलिया : एस डॅड, बट त्याचा इथं काय संबंध?डॅड : अगं, त्याच माधव भंडारीने आता सच्चाईच्या रायटरच्या बॉसला असरानी म्हटलंय आणि त्यावर त्या बॉसच्या एका चेल्याने यांच्या बॉसला म्हणजे अमित शहा नावाच्या साहेबाला गब्बरसिंग म्हटलंय!आलिया : हाऊ फनी डॅड. म्हणजे आता नवीन शोले तयार करणार का बिर्याणीवाले अंकल? आणि त्यात जय, वीरु पण असणार का? मग आता हे गब्बरसिंग हातात बेल्ट घेऊन विचारणार का, कितने आदमी थे... फनी मुव्ही डॅड.डॅड : अग, पण सरदार हमने आपका नमक खाया है. असं एकपण नाही म्हणत. आलिया : पण डॅड, बात तर बिर्याणी खाल्ली म्हणून बोटं मोडली अशी चालली होती. त्यात नमक कुठून आलं? आणि जाऊद्या त्या बिर्याणीचं, मला नव्या शोले मध्ये बसंतीचा रोल करायचायं, तुम्ही द्या तेवढा मिळवून, नाहीतर मी अनुपम अंकलना फोन करु का?डॅड : अगंबाई, ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही त्यात बोटं घालू नयेत.आलिया : ओह, आय सी. म्हणून बोटं मोडलं का निजामच? पण बिर्याणी तर चायवाल्या अंकलनी केली होती. त्यात गब्बरअंकल कुठून आले मध्येच? डॅड तुम्ही पण ना, नुसता घोळ घालता.(पुढचा मजकूर भेळेच्या मसाल्यामुळे वाचता येत नव्हता...)