शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

संभाजी देशमुखांच्या समाधीचा शोध

By admin | Published: February 27, 2017 2:49 AM

सुधागड तालुक्यातील तिवरे गावांतील समाधी, तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ऐतिहासिक दस्तावेज व ग्रंथाच्या अभ्यासांती शोधून काढण्यात यश आले आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- संभाजी राजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांच्या काळात, रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरील मोघलांचे साम्राज्य गनिमीकाव्याने उलथवून टाकून, सुधागड मराठ्यांच्या ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पराक्रमी संभाजी हैबतराव देशमुख यांची सुधागड तालुक्यातील तिवरे गावांतील समाधी, तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ऐतिहासिक दस्तावेज व ग्रंथाच्या अभ्यासांती शोधून काढण्यात यश आले आहे. त्याबाबतचे अधिकृत पुरावे सादर करून ती समाधी पराक्रमी संभाजी हैबतराव देशमुख यांची असल्याचे सिद्ध करण्यात परळी(पाली) येथील इतिहास अभ्यासक व संशोधक संदीप मु.परब यांना यश आले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाने इतिहास संशोधक परब यांच्या या ऐतिहासिक संशोधनास नुकतेच प्रसिद्ध करून इतिहासप्रेमी व अभ्यासकांसमोर ठेवले आहे. भोर संस्थानचे पहिले अधिपती पंतसचिव शंकराजी नारायण यांच्या पदरी संभाजी हैबतराव देशमुख हे सरदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या पराक्रमाबाबत आणि समाधीच्या अस्तित्वाबाबत ७८ विविध ऐतिहासिक दस्तपुराव्या खातर उपलब्ध असल्याचे संदीप परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.संभाजी हैबतराव देशमुख यांनी किल्ले सुधागड हस्तगत करण्यासाठी केलेल्या पराक्रमासंदर्भातील पहिला उल्लेख अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेल्या ‘भोर संस्थानचा इतिहास’ या ग्रंथात आढळतो. त्यामध्ये,‘सुधागड किल्ला चढून एकदम हल्ला करण्यास मार्ग नाही, असे पाहून त्यांच्या धारकऱ्यांनी तो युक्तीनेच छापा घालून घेण्याची खटपट केली आणि ती शेवटासही गेली. तेव्हा संभाजी हैबतराव, राघोजी गौळी, गणजी शिंदे न्हावी, रत्नोजी हुले, हिरोजी जाधव, जावजी चव्हाण, गंगाजी शिंदे वगैरे मुख्य धारकरी असून त्या सर्वांचा सरदार मालोजी भोसले नावाचा होता.या कालखंडासंदर्भात ग्रंथकार अनंत भागवत यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केलेला नसला तरी तो सुधागड या किल्ल्याशी निगडीत आहे. मात्र, संभाजी देशमुख यांना मिळालेल्या इनामपत्राच्या संदर्भातील नोंदीत याचा उल्लेख आहे. हा उल्लेख पोलादपूरच्या चित्रे दप्तरातून उपलब्ध झालेल्या पत्रानुसार, ‘ले-२३ , श १६१६ माग शु ९, पोलादपूर चित्रे श्री इ. १६९४ डिसें १५’ असा असल्याचा पुरावा उपलब्ध असल्याचे परब यांनी सांगितले. पंतसचिव शंकराजी नारायण यांच्या कडून संभाजी देशमुख यांना १६९४ मध्ये दिलेल्या इनामपत्रात सारे संदर्भ स्पष्ट होतात. यापत्रानुसार संभाजी देशमुख यांचे वास्तव्याचे ठिकाण असून कान्हिवली हा गाव त्यांना इनाम दिला होता, असे या पत्राच्याआधारे स्पष्ट होते.>संभाजी हैबतराव देशमुख समाधी सुधागड तालुक्यात मौजे तिवरे, येथे सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी आहे. समाधीची एक बाजू मोडकळीस आली असून समाधीचा इतर भाग सुस्थितीत आहे. समाधीच्या चारही बाजूस १० इंचात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. समाधीच्या मुख्य चौथऱ्याच्या मध्यभागी चौकोनात समाधी लेख कोरलेला आहे. या लेखात,‘संभाजीराव निरंतर बहिरजीराव शके. १७.२२’ असे नमूद करण्यात आले आहे.>समाधी लेखाची चिकित्साडॉ. मो. गं. दीक्षित यांनी ‘मराठेशाहीतील शीलालेख’ या आपल्या ग्रंथात महाराष्ट्रातील शके १४९७पासून शके १८०० पर्यंतचे सुमारे १५२ शीलालेख संग्रहित करून ते लेख कोरण्याकरिता वापरण्यात येणारा दगड, लेखाची जागा, लेख कोरण्याची पद्धत, लेखाची भाषा व लिपी, लेखाचे लिखाण, लेखाचा मायना, लेखाचा कालख्ांड व व्यक्तिनाम या विविध अंगाने विस्तृत असे विवेचन केलेले आहे. याचा आधार घेऊन मौजे तिवरे, ता. सुधागड, जि. रायगड येथील सरदार संभाजी हैबतराव यांच्या समाधीवरील लेखाचे निरीक्षण केले असता ही समाधी संभाजी हैबतराव देशमुख यांचीच असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे परब यांनी संबंधित पुराव्यांसह सांगितले.