मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्दयावरून बीड जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विवेक राहाडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खासदार संभाजीराजे यांनी दुख: व्यक्त केले असून विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणे, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
याचबरोबर, माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? असा सवाल करत या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे, कोणीही असे पर्याय निवडू नयेत, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.
याशिवाय, "एक लक्षात ठेवा हा समाज, 'लढून मरावं, मरून जगावं, हेच आम्हाला ठावं', असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!," असेही ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
सुसाईड नोट लिहून 'या' विद्यार्थ्याची मराठा आरक्षणासाठी आत्महत्यामी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.