शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Grampanchayat Election 2022: धुरळा! संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा; ग्रामपंचायतीत जिंकली पहिली जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 5:31 PM

Grampanchayat Election 2022: रुपाली ठमकेंनी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळवून दिला आहे.

Maharashtra Politics: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. (Grampanchayat Election 2022) ग्रामपंचायत निवडणुकीच्या  मतमोजणीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने तिसरे स्थान पटकावले आहेत. तर शिंदे गटाने चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. या निकालांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे चित्र असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मात्र, यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेने (Swarajya Sanghatna) विजयाचा श्रीगणेशा केला असून, एक उमेदवार विजयी झाला आहे. 

महाराष्ट्रातून पहिला विजय हा स्वराज्य संघटनेला नाशिकच्या गणेश गावातून मिळाला आहे. स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा हा नाशिक जिल्ह्यातील गणेश गावातील एका महिलेच्या रूपाने मिळाला असून रूपाली ठमके असे विजयी उमेदवाराचे नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते.

स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी 

स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आले होते. त्यापैकी गणेशगाव येथे सरपंच पदासाठी रूपाली ठमके यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा तिथे विजय झाला आहे. याशिवाय राजेवाडी, गंगावरे-सावरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान, स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी फोनद्वारे रूपाली यांचे अभिनंदन केले आहे. रूपाली ठमके यांच्या रूपाने स्वराज्य संघटनेला पहिली सरपंच महिला निवडून येण्याचा मान मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीgram panchayatग्राम पंचायत