शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

समीर भुजबळ यांना अटक

By admin | Published: February 02, 2016 4:21 AM

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी रात्री अटक केली असून

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता (मनी लाँड्रिंग) प्रकरणी तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केली असून, त्यांना उद्या, मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सरकारी कंत्राटे मंजूर झालेल्या कंपन्यांकडून समीर आणि छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज हे ज्या काही कंपन्यांचे संचालक होते त्यांना लाच मिळाली असल्याचा आरोप आहे. या प्रकरणांत ईडीने १७ जून २०१५ रोजी महाराष्ट्र सदन आणि सेंट्रल लायब्ररी प्रकरणात एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट तयार केला होता. महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी ईडीने भुजबळ यांच्याविरोधात यापूर्वीच दोन एफआयआर दाखल केले आहेत. महाराष्ट्र सदन बांधकाम आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी कुठपर्यंत आली आहे, याचा ताजा रिपोर्ट सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २८ जानेवारी रोजी ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली. समीर यांच्या निश इन्फ्रास्ट्रक्चर, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इदीन फर्निचर या कंपन्यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली. समीर आणि पंकज भुजबळ हे निश आणि ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक होते तर समीरची पत्नी शेफाली आणि पंकजची पत्नी विशाखा या ईदीन फर्निचरच्या संचालक होत्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईडीने भुजबळांच्या मालकीचा वांद्र्यातील रिकामा प्लॉट आणि सांताक्रुज येथील नऊ मजली इमारत हस्तगत केली होती. वांद्रे (पश्चिम) येथील सेंट मोनिका स्ट्रीटवरील या रिकाम्या भूखंडांवर हबीब मॅनोर व सॉलिटेअर या नावाने नऊ मजली इमारत (किमत ११० कोटी रुपये) उभ्या होत्या. या दोन्ही मालमत्ता ईडीने जप्त केल्या. त्याआधी ईडीकडे नोंदल्या गेलेल्या आणखी एका प्रकरणात ईडीने खारघरमधील हेक्स वर्ल्ड ही १६० कोटी रुपये किमतीची जमीनही ताब्यात घेतली होती. ईडीच्या कार्यालयात समीर यांच्यासोबत त्यांचे वकील अ‍ॅड. सजल यादव हेही गेले होते. मात्र चौकशीदरम्यान त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. ईडीला छाप्यात काहीही आढळून आलेले नाही, असे पंचनाम्यावरून स्पष्ट होते, असे अ‍ॅड. यादव यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन आणि सेंट्रल कालिना विद्यापीठ प्रकरणात छगन भुजबळ हे आरोपी असले तरी हेक्स वर्ल्ड प्रकरणात मात्र त्यांचे नाव नाही. याआधी चमणकर एंटरप्रायजेसच्या मालकीची १७.३५ कोटींची मालमत्ता हस्तगत केली होती.> समीर भुजबळ यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी बेलार्ड इस्टेट येथील कार्यालयात दिवसभर चौकशी केली. मात्र चौकशीत समीर यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करणे अपरिहार्य होते, असे वृत्त ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आले आहे.ईडीने छापे घातले, तेव्हा छगन भुजबळ मुंबईत नव्हते. ते आजच पहाटे अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकन काँग्रेसच्या निमंत्रणावरून ते तिथे गेले असून, सामाजिक न्याय आणि शैक्षणिक सहकार्य व संवाद या विषयावर तिथे संबंधित सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.नऊ ठिकाणी छापे : छगन भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी सोमवारी छापे घातले. छापे घतलेल्या नऊ ठिकाणांमध्ये वांद्र्यातील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे कार्यालय, वरळीतील सुखदा सोसायटीतील भुजबळांचे अपार्टमेंट आणि सांताक्रुज येथील सॉलिटेअर बिल्डिंगचा समावेश आहे. एकट्या मुंबईत आम्ही नऊ ठिकाणी छापे टाकल्याचे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सूडबुद्धीने कारवाई - मलिक : सरकार भुजबळ यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करत असून ईडी, एटीएससारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई कशी होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.