ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळ यांच्या न्यायलयीन कोठडीत २२ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी इडीने ९ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांनी अटक करण्यात आली होती. आज मुंबई न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. इडीच्या या कारवाई भुजबळ कुंटुंबीयांविरुद्ध कारवाईचा फास आवळ्लयाचे दिसते आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत.
दरम्यान, उद्या ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी भवनमध्ये दुपारी ४ वाजता पत्रकार परिषेद घेणार असल्याची माहीती नवाब मलिक यांनी दिली आहे. छगन भुजबळ सध्या अमेरिका मध्ये आहेत. काल (रविवारी) इडीने समीर आणि पंकज भुबळ यांचे पासपोर्ट हस्तगत केले .
छगन भुजबळ लवकरच अमेरिकेतून मुंबईत परतणार असून, ते विमानतळावर आल्यानंतर त्यांचाही पासपोर्ट ताब्यात घेण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. याआधी छगन भुजबळ यांनी आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप करत कायद्याच्या मार्गाने आपण लढू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.