ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळ यांच्या न्यायलयीन कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांची न्यायालयीन कोठडीत २२ फेब्रुवारी पर्यंत होती. भुजबळ यांच्या परवेश कंपनीमार्फत आणखी ३० कोटी रुपयांचे अनधिकृत ट्रान्सॅक्शन आढळून आले असल्याची माहीती ईडीनं आज कोर्टाला दिली. १ फेब्रुवारी रोजी इडीने ९ तास कसून चौकशी केल्यानंतर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आली होती. आज मुंबई न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. इडीच्या या कारवाईमुळे भुजबळ कुंटुंबीयांविरुद्ध कारवाईचा फास आवळ्लयाचे दिसते आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत.
दरम्यान,
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. याआधी छगन भुजबळ यांनी आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप करत कायद्याच्या मार्गाने आपण लढू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.