शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

समीरनेच गोळ्या झाडल्याचा संशय

By admin | Published: September 18, 2015 1:00 AM

पानसरे हत्या प्रकरण : प्रेयसीसह आणखी तिघे ताब्यात; मोबाईलवरील आवाजाचे नमुने गुजरातला पाठविले

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून मारेकऱ्यांचे रेखाचित्र बनविले होते. संशयित समीर गायकवाड याचा चेहरा रेखाचित्रांशी मिळताजुळता असून पानसरे यांच्यावर समीरनेच गोळ्या झाडल्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड याच्या ‘ज्योती’ नावाच्या मुंबईतील प्रेयसी आणि संकेश्वर येथील दोन नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या मोबाईल संभाषणाच्या आवाजाचे नमुने गुजरातला पाठविण्यात आले आहेत.पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून तज्ज्ञ रेखाचित्रकाराकडून संशयितांची रेखाचित्रे तयार केली होती. ६ जून २०१५ रोजी ती देशभर प्रसिद्ध केली होती. पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्रांमध्ये एकाचा रंग सावळा, चेहरा उभट, नाक टोकदार, तुरळक भुवया आहेत; तर दुसऱ्या मारेकऱ्याचा चेहरा गोल, रंग सावळा, नाक टोकदार असून दोघांच्याही डोक्याला हिवाळी गुलाबी-तांबूस रंगाची मळकट टोपी व काळी दाढी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने अंगामध्ये कुर्ता व शबनम बॅग अडकविलेलीदिसत होती. तयार करण्यात आलेले रेखाचित्र हे मारेकऱ्यांशी ८० टक्के मिळतेजुळते आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. समीर गायकवाड याचा चेहरा रेखाचित्रांशी मिळताजुळता असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानेच पानसरे यांच्या हत्येचा कट रचून स्वत: पानसरे दाम्पत्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करीत आहेत.ज्येष्ठ नेते पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड याच्या ‘ज्योती’ नावाच्या मुंबईतील प्रेयसी आणि संकेश्वर येथील दोन नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या मोबाईल संभाषणाच्या आवाजाचे नमुने गुजरातला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर गायकवाड (वय ३२) याला बुधवारी पहाटे कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यावरून ज्यांच्याशी त्याचे संभाषण झाले, त्यामध्ये एका तरुणीसह दोघा तरुणांचा समावेश होता.पोलिसांनी त्यांच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने ते मुंबई, पणजी, संकेश्वर येथे राहत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी) ती प्रेयसी असल्याची समीरने दिली कबुलीसर्वांत जास्त मोबाईल कॉल्स ज्या तरुणीला झाले होते. तिच्याशी तुझे काय संबंध आहेत, अशी विचारणा केली असता ती आपली प्रेयसी असल्याची कबुली त्याने दिल्याचे समजते. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा त्याच्या मुंबईतील प्रेयसीसह जवळच्या दोन नातेवाइकांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी दिवसभर त्यांची कसून चौकशी केली. प्रेयसीचा प्रत्यक्ष सहभाग ?पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाला तेथील सरस्वती चुणेकर विद्यालयातून जे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले होते, त्याची तपासणी करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेतली असता शाळेतील कॅमेऱ्यामध्ये पानसरे दाम्पत्य चालत गेल्यानंतर काही सेकंदांत मोटारसायकलवरून दोघेजण जात असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यावर पाठीमागे बसलेली व्यक्ती तरुणी असल्याचा संशय सुरुवातीपासून होता. त्यामुळे हत्येमागे गायकवाडच्या प्रेयसीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार ते चौकशी करीत आहेत.पानसरे को मारा, दुसरे को भी मारूॅँगासंशयित समीर गायकवाड याचे प्रेयसीसोबत मोबाईलवर झालेल्या संभाषणात ‘पानसरे को मारा और एक बाकी है, उसको भी मारूॅँगा..!’ असा अस्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला आहे. असे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. पानसरे हत्येप्रकरणी आणखी तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित समीर गायकवाड हा तपासात सहकार्य करीत नाही. त्याच्यासह चौघांकडे चौकशी सुरू असून लवकरच यामागील चित्र स्पष्ट होईल. - संजयकुमारअप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभागपुण्याच्या ‘सायबर सेल’चे पथक कोल्हापुरातपुणे येथील ‘सायबर सेल’चे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. संशयित गायकवाड याच्याकडून २३ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलवरून ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत, त्याची माहिती हे पथक स्वतंत्रपणे तपास करून घेत आहे.समीरच्या घरातून २३ मोबाईल, चाकू जप्तसांगली : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित समीर गायकवाडच्या सांगलीतील घरातून पोलिसांनी २३ मोबाईल हॅण्डसेट, एक कॅमेरा, रॅम्बो लोखंडी चाकू व बँक पासबुक जप्त केले आहे. बुधवारी दुपारी बारा वाजता सुरू झालेली घरझडती रात्रीपर्यंत सुरू होती. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी जप्त केलेला ऐवज गुरुवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिला.समीर गायकवाड याच्याकडे पोलीस चौकशी करीत असताना त्याने ‘आम्ही चेष्टा-मस्करीमध्ये पानसरेंच्या हत्येसंदर्भात फोनवर बोलत होतो. या हत्येशी माझा काहीही संबंध नाही,’ असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस तो सांगेल त्या माहितीची अत्यंत बारकाईने खातरजमा करीत असल्याचे तपास पथकाचे प्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी सांगितले.