मुंबई : माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विकासकाने स्थानिकांच्या मान्यता मिळविण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे. विकासकाने माझगाव ताडवाडी पुनर्विकास प्रकल्पांच्या अटीशर्तीनुसार ताडवाडी येथे सॅम्पल फ्लॅट उभारला आहे. मात्र, हा सॅम्पल फ्लॅट स्थानिकांना दाखविण्यासाठी सर्व चाळींतील प्रत्येक घरासाठी आकर्षक ‘आमंत्रण पत्रिका’ छापण्यात आल्या आहेत. माझगाव ताडवाडी येथील पुनर्विकास प्रकल्पाकरिता बीआयटी चाळीतील स्थानिकांच्या मान्यता मिळविण्यासाठी विकासकाने खास आमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. माझगाव येथे बांधण्यात आलेला सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी प्रत्येक चाळीला वेळ निश्चित करून दिला आहे. शिवाय, सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी जाताना ही आमंत्रण पत्रिका बाळगणे अनिवार्य असल्याचे विकासकाने सांगितले आहे. हा फ्लॅट पाहण्यासाठी जाणाऱ्या स्थानिकांची घराच्या क्रमांकाप्रमाणे नोंदही केली जात आहे, तसेच सॅम्पल फ्लॅटमध्ये स्थानिकांच्या डोळ््यांना दिपवणारी आकर्षक रोषणाई आणि व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, स्थानिकांना फ्लॅट पाहण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी दोन तरुणांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी भायखळा येथील संत सावता माळी सभागृहात विकासक आणि चाळ क्रमांक १, २ मधील स्थानिक रहिवाशांची सभा पार पडली. या वेळी स्थानिकांनी संक्रमण शिबिर, भाडे, पुनर्विकास प्रकल्पाची मुदत असे अनेक मुद्दे विकासकासमोर मांडून निरसन करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)>काय आहे चाळींतील रहिवाशांची स्थितीगेल्या कित्येक वर्षांपासून माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प रखडलेला आहे. माझगाव ताडवाडी भागात बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या (बीआयटी) १६ चाळी होत्या. त्यातील तुलनेने अधिक धोकादायक असलेल्या चाळ क्रमांक १२ आणि १३ पाडून त्यातील रहिवाशांना त्याच परिसरात संक्रमण शिबिर बांधून देण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी इमारत क्रमांक १४, १५, १६ धोकादायक जाहीर करून, त्यातील जवळपास २४० रहिवाशांनाही माहुल येथे पर्यायी जागा देण्यात आली.
घराघरांत वाटल्या सॅम्पल फ्लॅटच्या ‘आमंत्रण पत्रिका’
By admin | Published: January 16, 2017 2:14 AM