शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Samruddhi Mahamarg: 'जमीन देऊ नका सांगायला 'नेते' गावात जायचे, तरीही...'; समृद्धीच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा थेट मातोश्रीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 6:33 AM

देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली स्वप्नपूर्तीची भावना

समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना हा मार्ग होणारच नाही असे वाटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यावेळचे नेते तर मार्गासाठी अधिग्रहण सुरू असताना विरोध करायला गावांमध्ये जायचे, एकही इंच जमीन देऊ नका, असे आवाहन करत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे एकनाथ शिंदे यांनी गावांमध्ये जाऊन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत टीकेची झोड उठवली.

समृद्धीचा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार अन्य समाजघटक अशा सर्वांना विश्वासात घेतले. एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत होते. या महामार्गासाठी जागेचे अधिवाहन केले, तेव्हा एकही प्रकरण कोर्टात गेले नाही, जमीन अधिग्रहणाचे नवीन मॉडेल आम्ही यासाठी तयार केले आणि केंद्र सरकारच्या धोरणाचा वापर करून ५० हजार कोटीचा निधी उभा केला. हे ५० हजार कोटी रुपये पुढच्या दोन वर्षात परत येतील आणि त्यातून आणखी नवे प्रकल्प आम्हाला राज्यात साकारता येणार आहेत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान कार्यालयाच्या वेगवान निर्णयप्रक्रियेचे अभिनंदन केले व मोदी यांचे सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी आभार मानले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मोपलवार यांचे विशेष कौतुकसमृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवथापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच मनोज सोनिका, प्रवीण परदेशी, गायकवाड आटी अधिकायांच्या चमूचे कौतुक केले. प्रकल्पाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत या चमूच्या प्रयत्नांचा या स्वप्नात मोठा वाटा असल्याचे शिंदे, फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग