शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

CoronaVirus News: कोरोनामुळे समृद्धी महामार्गाचा मुहूर्त हुकणार; पहिला टप्पा दोन महिनेे लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:07 AM

नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा रस्ता १ मेपर्यंत खुला होईल, असे सांगण्यात येत होते; परंतु समृद्धी महामार्गाच्या बांधकामात कार्यरत असलेल्या अनेक कामगार तसेच पर्यवेक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत.

- विनय उपासनीमुंबई : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा नागपूर ते शिर्डी हा सुमारे ५२० किमी लांबीचा टप्पा महाराष्ट्रदिनी सुरू करण्याचा मुहूर्त किमान दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे महामार्गाच्या बांधकामावर परिणाम झाला आहे.नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा रस्ता १ मेपर्यंत खुला होईल, असे सांगण्यात येत होते; परंतु समृद्धी महामार्गाच्या बांधकामात कार्यरत असलेल्या अनेक कामगार तसेच पर्यवेक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असल्याने नागपूर व वर्धा या दोन पॅकेजला होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या असून, त्याचा थेट परिणाम समृद्धी महामार्गाच्या बांधकामावर झाला आहे.१६ विभागांत काम सुरूसमृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ विभागांत प्रगतिपथावर असून त्यासाठी विविध राज्यांतून आलेले सुमारे ३० हजार मजूर कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मजुरांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावली आहे. त्यातच पर्यवेक्षकांनाही कोरोनाची बाधा झाल्याने बांधकामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.संरक्षक भिंत, पेट्रोल पंप उभारणीत अडथळे७०१किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. तसेच सुमारे २० ठिकाणी पेट्रोल पंपांची निर्मिती केली जाणार आहे; परंतु कोरोनाने कामगार वर्गाच्या रोडावलेल्या संख्येमुळे या दोन्ही कामांच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे.सातत्याने ग्राउंड वर्कचा आढावा घेत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समृद्धी महामार्गाच्या बांधकामावर झालेल्या परिणामाचा आढावा घेऊन बांधकामाचे पॅकेजनिहाय पुनर्नियोजन आम्ही करत आहोत.- राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकोठे, किती बाधा?नाशिक (पूर्व) : ९६ मजूरनाशिक (पश्चिम) : १७५ मजूर होळीनिमित्त गावी गेले असून कोरोनाच्या भीतीने परत येण्यास विलंब होत आहेजालना : ४२ (त्यापैकी १२ पर्यवेक्षक आणि २३ मजूर)

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग