शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Toll Rate: समृद्धीवर किती लागेल टोल? बाबो! शिर्डी-नागपूर प्रवासात तब्बल १८ ठिकाणी टोल नाके

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 6:15 AM

अवजड वाहनांना ५,८०९ रुपये टोल भरावा लागणार, कारला किती...

लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई : राज्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शिर्डी-नागपूर या पहिल्या टप्प्यावरील प्रवास सुरू झाला आहे. हा पहिला टप्पा ५२० किमीचा असून या प्रवासादरम्यान १८ टोलनाके लागणार आहेत. या टोलनाक्यांवरील टोलची यादी जाहीर झाली असून हलक्या वाहनांना म्हणजेच कारला ८९९ रुपये तर अति अवजड वाहनांना ५,८०९ रुपये टोल भरावा लागणार आहे.

टोलचे दर असे...वाहनांचा प्रकार                                       २०२२        २०२५        २०२८       २०३१मोटार, जीप, व्हॅन, हलकी मोटार वाहने     १.७३ रु.    २.०६रु.    २.४५रु.    २.९२रु.मालवाहतुकीची, व्यावसायिक वाहने, मिनी बस    २.७९ रु.    ३.३२रु.    ३.९६रु.    ४.७१रु.बस अथवा ट्रक (२ आसांची)    ५.८५ रु.    ६.९७रु.    ८.३०रु.    ९.८८रु.तीन आसांची व्यावसायिक वाहने    ६.३८ रु.    ७.६०रु.    ९.०५रु.    १०.७८रु.अवजड बांधकाम यंत्रसामग्री वाहने     ९.१८ रु.    १०.९३रु.    १३.०२रु.    १५.५१रु.अति अवजड वाह    ११. १७रु.    १३.३०रु.    १५.८४रु.    १८.८७रु.     (टोलदर प्रतिकिमीसाठी)

टोलच्या परिपत्रकात ११ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतचे (पहिली तीन वर्षे) दर आणि त्यानंतर पुढील प्रत्येक तीन वर्षांनी दरात करण्यात येणारी वाढ देण्यात आली असून दहा वर्षांपर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. चार टप्प्यांतील टोलवाढीचा अखेरचा टप्पा हा १ एप्रिल २०३१ ते १० डिसेंबर २०३२ पर्यंतचा असेल.

सूट देण्यात आलेली वाहनेराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान,  मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश,  लोकसभा सभापती, राज्यसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष,  उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कराची वाहने,  केंद्र आणि राज्य सशस्त्र सेना दलाची, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका.

नागपूर ते शिर्डी टोलअंतर : ५२० किमीवाहनाचा प्रकार : मोटार, जीप, व्हॅन, हलके वाहनटोलची किमान रक्कम :  ८९९ रु.बस किंवा ट्रक(दोन एक्सल) : ३,०४२ रु. अति अवजड वाहन ५,८०८ रु. 

मुंबई-नागपूर प्रवास सुरू झाल्यावर (अंतर ७०१ किमी)n मोटार, जीप, व्हॅन, हलके वाहन - सुमारे १,२१२ रु. n बस किंवा ट्रक(दोन एक्सल) - सुमारे  ४,१०० रु.n अति अवजड वाहने - सुमारे ७,८३१ रु.

येथे आहेत नाकेवायफळ, सेलडोह वडगाव बक्षी, येळकेली,  विरूल, धामणगाव (आसेगाव), गावनेर तळेगाव (शिवनी), कारंजा लाड, शेलू बाजार/ वनोजा,  मालेगाव, मेहकर, दुसरबीड, सिंदखेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव-जांबरगाव, कोकमठान 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गtollplazaटोलनाका