शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

समृद्धी महामार्गामुळे चेहरामोहरा बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:24 AM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.राज्य शासनाच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कर्न्व्हजन्स २०१८’ या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर झाले. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, रामदास आठवले, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह देशविदेशातील प्रख्यात उद्योगपती मंचावर उपस्थित होते.एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य असेल, असे सांगून मोदी म्हणाले, देशातील सर्व राज्यांमध्ये विकासाची स्पर्धा आज होत आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न सगळेच करीत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचे पर्व आणखी पुढे गेले आहे. ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’द्वारे त्यांनी सुधारणांचे आणि मानवी हस्तक्षेप कमी करणारे निर्णय घेतल्याने आणि कालमर्यादेत निर्णय घेणारे वर्क कल्चर आणल्याने आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्यावर्षी देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात (५१ टक्के)आली.मेक इन इंडियात दोन वर्षापूर्वी झालेल्या करारांपैकी निम्मेपेक्षा अधिक प्रगतीपथावर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.टाटा म्हणतात,महाराष्ट्र अतुल्यटाटा समूहातील पहिल्या कंपनीची सुरूवात १८७७ मध्ये नागपुरात झाली. इतक्या वर्षांचा अनुभव, येथील वास्तव्य व आजच्या नेतृत्त्वाबद्दलचा अनुभव यावरुन मी सांगतो की महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अतूल्य आहे. टाटांकडून या राज्याला कायम सहकार्य मिळत राहील, अशीग्वाही प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी दिली.राज्यात गुंतवणूकअनुकुल वातावरण तयार केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासह नामवंत उद्योगपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली. इझ आॅफ डुर्इंग बिझनेसह कालमर्यादेत ते घेत असलेल्या निर्णयांचे टाटा-अंबानींसह सर्वांनीच कौतूक केले.शिवसेनेचा सहभाग केवळ देसार्इंपुरताचआजच्या उद्घाटन समारंभात शिवसेनेचा सहभाग हा केवळ उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यापुरताच मर्यादित राहिला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परिषदेला पाठ दाखविली. शिवसेनेचे अन्य मंत्री वा नेते फिरकले नाहीत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग