पुणे : बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक किशोर सानप, लेखक डॉ. रवींद्र शोभणे आणि बालसाहित्यिक प्रा. विश्वास वसेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. मसापकडे आता एकूण सहा अर्ज दाखल झाले आहेत.किशोर सानप यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची स्वाक्षरी आहे. अनुमोदक म्हणून अशोक बागवे, प्रदीप निफाडकर, प्रा. विश्वनाथ कराड, राजीव जोशी आणि स्वाती नातू यांच्या स्वाक्षºया आहेत. सानप यांनी यापूर्वी बडोदा आणि मुंबई येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.शोभणे यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची स्वाक्षरी आहे. अनुमोदक म्हणून भारत सासणे, डॉ. मंदा खांडगे, डॉ. तुकाराम रोंगटे, प्रा. सुजाता शेणई आणि नीलिमा बोरवणकर यांच्या स्वाक्षºया आहेत. वसेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून राजीव बर्वे यांची स्वाक्षरी आहे. अनुमोदक म्हणून सुरेश पाटोळे, रुपाली अवचरे, स्नेहसुधा कुलकर्णी, डॉ. संगीता बर्वे आणि विनायक लिमये यांच्या स्वाक्षºया आहेत. यापूर्वी ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर, लेखक लक्ष्मीकांत देशमुख आणि कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी सानप, शोभणे, वसेकरांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:21 AM