शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सनातन संस्था आरोपीच्या पाठीशी!

By admin | Published: September 19, 2015 4:52 AM

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याच्या पाठीशी असल्याचे सनातन संस्थेने शुक्रवारी

मुंबई : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याच्या पाठीशी असल्याचे सनातन संस्थेने शुक्रवारी स्पष्ट केले. दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केला.वर्तक म्हणाले, की तांत्रिक कारणास्तव गायकवाड याला अटक झालेली आहे; मात्र त्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. तरीही श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, सचिन सावंत अशा व्यक्ती सनातनवर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत. न्यायालयात याचिका दाखल करीत पोलीस आणि सरकारी यंत्रणांवर दबाव निर्माण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असल्याचा दावाही त्यांनी केला.पुरोगाम्यांच्या दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे तपास होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्याची मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी यावेळी केली. काही व्यक्ती आणि संस्थांचे आर्थिक घोटाळे सनातन संस्थेने उघड केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी सनातनला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असे ते म्हणाले. सनातनसोबत हिंदू गोवंश रक्षा समिती, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ, श्री महाराष्ट्र रामलीला मंडळ या हिंदुत्ववादी संघटनांनी समीरच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला.चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशीकोल्हापूर : संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यासह त्याची प्रेयसी आणि दोघांजवळच्या नातेवाइकांची ‘इन कॅमेरा’ चौकशी सुरू आहे. सुरू असलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. तपासप्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजयकुमार कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. शुक्रवारी संशयितांना विचारलेल्या प्रश्नांसह त्यांनी दिलेल्या उत्तरांची थेट संगणकावर नोंद केली जात होती. तसेच या चौकशीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे.‘सायबर सेल’ परतलेपुणे येथील ‘सायबर सेल’च्या चौघा तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले होते. जप्त केलेल्या मोबाइलवरून व ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत.