लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाऊस सुरू झाल्याच्या नावाखाली रेतीची साठेबाजी करण्यात रेती माफिया गुंतले आहेत. रेतीच्या साठवणुकीतून व्यवसायात चांदी करण्याचा गोरखधंदा सुरू करण्यात आला आहे.अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत यावर्षी लिलाव करण्यात आलेल्या रेती घाटांची मुदत येत्या सप्टेंबरअखेर संपणार आहे; परंतु पावसाळा सुरू झाल्याच्या नावाखाली रेती माफियांकडून रेतीची साठवणूक सुरू करण्यात आली आहे. रेतीघाटांमधून आणलेल्या रेतीचे ढीग गावाबाहेर मोकळ्या जागेत लावण्यात येत आहेत. रेतीची अवैध साठवणूक करून, रेती वाढीव दराने विकण्याच्या व्यवसायात चांदी करून घेण्याचा गोरखधंदा सुरू करण्यात आला आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.रेतीच्या वाढीव दराचा ग्राहकांना फटका!पाऊस सुरू झाल्याने, नदी-नाल्यातील रेतीची वाहतूक करता येत नसल्याच्या नावाखाली रेती वाढीव दराने विकली जात आहे. पाच दिवसांपूर्वी पाच ते सहा हजार रुपये प्रतिट्रक दराने विकली जाणारी रेती पाऊस सुरू होताच सात ते आठ हजार रुपये प्रतिट्रक दराने विकली जात आहे. रेतीच्या वाढीव दराचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
साठेबाजी करण्यात गुंतले रेती माफिया!
By admin | Published: June 08, 2017 2:49 AM