नाशिक : जळगावमधील रामानंद पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संशयित सागर चौधरीचे वाळू व्यवसायातील भागीदार रवींद्र चौधरी यांची सुमारे साडेसहा तास चौकशी केली़ यामध्ये आणखी एक वाळू व्यावसायिक राजेश मिश्रा यांची मंगळवारी, तर मनसे नगरसेवक ललित कोल्हे यांची बुधवारी चौकशी केली जाणार आहे़ रामानंदनगर परिसरातील रस्ते अवजड वाहतुकीसाठी बंद असूनही सर्रास वाहतूक केली जात असल्याने आंदोलन करणार असल्याची माहिती नागरिकांनी ३ मे २०१५ रोजी पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांना फोनद्वारे दिली़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र उगले हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी काही मुरूम व रेतीची वाहतूक करणारी वाहने पकडली़ या वाहनांना सोडून द्या, असे सांगण्यासाठी गेलो असता सादरे यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची तक्रार सागर व रवींद्र चौधरी यांनी वरिष्ठांकडे केली होती़या तक्रार अर्जाबाबत ७ मे २०१५ रोजी पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी लेखी जबाबात वरिष्ठांकडे आपली बाजू मांडली होती़ यानंतर सागर चौधरी, राजेश मिश्रा व रवींद्र चौधरी यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता़ सादरेंवर खंडणीचा गुन्हाही दाखल झाला़ या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनीही या तिघांच्या चौकशीसाठी समन्स काढले होते़ (प्रतिनिधी)सादरेंच्या हस्ताक्षर अहवालाची प्रतीक्षापोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षराची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आली आहे़ हा हस्ताक्षर तपासणी अहवाल सीआयडीला अद्याप मिळाला नसल्याचे वृत्त आहे़
वाळू व्यावसायिक चौधरींची सीआयडी चौकशी
By admin | Published: November 17, 2015 1:04 AM