शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

वाळू तस्करी समाजविघातक गुन्हा

By admin | Published: October 13, 2016 5:31 AM

नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत,

मुंबई : नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत, मुंबई उच्च न्यायालयाने जळगाव जिल्ह्याच्या भादगाव तालुक्यातील एका वाळू तस्कराच्या स्थानबद्धतेवर शिक्कामोर्तब केले आहे.गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी करणे आणि ती करीत असताना गावकऱ्यांना दमदाटी व मारहाण करणे व प्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांवरही हल्ला करणे अशा कारणांवरून जळगावच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्याविरुद्ध १६ मार्च रोजी स्थानबद्धता आदेश काढला होता. नीलेशचा मित्र हरीश पाटील याने याविरुद्ध केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला.देसले यास पूर्वी फौजदारी गुन्ह्यांत रीतसर अटक झाली होती, परंतु स्थानिक न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. त्यानंतर, दोन साक्षीदारांनी नोंदविलेल्या ‘इन कॅमेरा’ जबानीच्या आधारे त्याच्यावर ही स्थानबद्धतेची कारवाई केली गेली. देसले गावकऱ्यांना कशी दमदाटी करतो, त्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रात्री त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी जाणेही कसे मुश्कील होते व देसले आणि त्याच्या माणसांनी एक-दोन वेळा सरकारी अधिकाऱ्यांवरही कसे हात उगारले, याची माहिती या साक्षीदारांनी दिली होती.देसले याच्या वतीने इतर मुद्द्यांखेरीज असाही मुद्दा मांडला गेला की, साक्षीदारांनी दिलेली जबानी वादासाठी खरी मानली, तरी तिचे स्वरूप व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडल्याचे किंवा बिघडू शकेल, अशी परिस्थिती असल्याचे दिसत नाही. हे अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, या कृत्यांकडे एकाकीपणे पाहता येणार नाही. वाळू तस्करीचा एकूणच त्या भागातील पर्यावरण, शेती, पाणी इत्यादींवर होणारा दुष्परिणाम आणि गावकऱ्यांना दमदाटी व सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण यामुळे निर्माण होणारी दहशत याचा एकत्र विचार करता, देसले याची कृत्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक अशीच ठरतात.न्यायालय म्हणते की, सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे शांतता, सुरक्षा व समाजजीवन सुरळीतपणे चालणे. वाळू ही नदीपात्रामध्ये सहजपणे मिळणारी वस्तू असली, तरी तिचे जतन करणे स्थानिक लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे. नदीपात्रांमधून बेसुमार वाळू काढणे व तिची तस्करी करणे याचे गंभीर परिणाम दिसून आलेले आहेत. अनिर्बंध वाळूउपशामुळे जलपातळी खालावते व त्यामुळे पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी पाण्याच्या तुटवडा निर्माण होते. पर्यावरणाचा ऱ्हास होण्याखेरीज शेतकऱ्यांचे व स्थानिक नागरिकांचे आर्थिक नुकसानही होते. या सर्वाचा एकत्रित परिणाम सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्यात होतो. (विशेष प्रतिनिधी)