संदीप सिंह आणि भाजपा, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?; काँग्रेसकडून निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 07:00 PM2020-08-30T19:00:12+5:302020-08-30T20:11:33+5:30

संदीप सिंहने भाजपाच्या कार्यालयात ते ५३ फोन कोणाला केले होते, याचीही स्पष्टता अजून होत नाही.

Sandeep Singh and BJP, ‘What is this relationship called?’, Targeted by Congress | संदीप सिंह आणि भाजपा, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?; काँग्रेसकडून निशाणा 

संदीप सिंह आणि भाजपा, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?; काँग्रेसकडून निशाणा 

Next
ठळक मुद्देमोदींच्या बायोपीकच्या बदल्यात हा करार झाला का? संदीपसिंहवर भाजपा एवढा मेहरबान का झाला ? या प्रशांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजूपत प्रकरणाचे धागेदोरे भाजपापर्यंत कसे पोहचत आहेत, हे आता प्रकाशात येत आहे. मोदींचा बायोपिक बनवणाऱ्या संदीप सिंहचे नाव या प्रकरणात ड्रग संदर्भात जोडले गेले. हे पाहता संदीप सिंह, भाजपा व ड्रग माफिया यांच्यातील संबंधावर प्रकाश पडत आहे. तसेच १४ जूनला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच संदीप सिंहने भाजपाच्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे म्हणत संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.   

संदीप सिंहच्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद पाहता त्याच्या कंपनीला २०१७ मध्ये ६६ लाखांचे नुकसान झाले होते, २०१८ मध्ये ६१ लाखांचा फायदा तर पुन्हा २०१९ मध्ये ४ लाखांचे नुकसान झाल्याचे दिसते. अशा तोट्यातील कंपनीबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार कसा काय केला? ही कंपनी पैसे कोठून आणणार होती? मोदींच्या बायोपीकच्या बदल्यात हा करार झाला का? संदीपसिंहवर भाजपा एवढा मेहरबान का झाला ? या प्रशांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

संदीप सिंहने भाजपाच्या कार्यालयात ते ५३ फोन कोणाला केले होते, याचीही स्पष्टता अजून होत नाही. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत, अशा व्यक्तीची शहानिशा न करताच त्याच्या कंपनीशी करार कसा काय केला हेही आश्चर्यकारक आहे. हे सर्व पाहता सखोल चौकशी केल्यास यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी स्पष्ट होतील, असे सावंत म्हणाले.

आणखी बातम्या...

- सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता    

- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

Web Title: Sandeep Singh and BJP, ‘What is this relationship called?’, Targeted by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.