मुंबई : दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाषण करताना आमदार संदीपान भुमरे भावूक झाले. आपला एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील सत्तेत उलथापालथ झाली. संभाजीनगरमध्ये जो उमेदवार तुम्ही देणार तो निवडून आणणार नाहीतर तोंड दाखवणार नाही असे म्हणत तुम्ही ज्यांना मोठे केले गेल्या काही दिवसात ज्यांना तुम्ही भरभरून मदत केली ते देखील तुमच्या बद्दल बोलत होते. त्यांना सोडू नका, असे संदीपान भुमरे म्हणाले.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी एक खंत आहे. तुम्ही ज्यांना मोठे केले गेल्या काही दिवसात ज्यांना तुम्ही भरभरून मदत केली ते देखील तुमच्या बद्दल बोलत होते. त्यांना सोडू नका. तुम्ही मनाने त्यांना माफ कराल. पण आम्ही त्यांना सोडणार नाही. संभाजीनगरमध्ये जो उमेदवार तुम्ही देणार तो निवडून आणणार नाहीतर तोंड दाखवणार नाही, असे संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून सांगितले.
याचबरोबर, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना पदाचा विचार केला नाही. ठाण्याला पुढे चला असे शिंदेंनी म्हटले होते. रस्त्याने जाताना विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी मला बड्या नेत्याचा फोन आला. तुमचे पद आणि आमदारकी जाईल असे सांगितले. पण, आम्ही सांगितले की शिंदे साहेब मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत माघार नाही. वर्षावर एक दोन वेळा बैठक लावली. पण काही सांगायला गेलो की दुसरी माणसं आत असायची. मंत्र्यांची ही अवस्था तर आमदारांचे काय? पैशाने आमदार फुटत नाहीत, असे संदीपान भुमरे म्हणाले.