शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

संघ देश चालवत नाही - राजनाथ सिंह

By admin | Published: September 06, 2015 12:44 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा

मुंबई/पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आमच्याकडून गोपनीयतेच्या शपथेचा भंग होत नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली येथील समन्वय बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे १२ केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. त्यावरून विरोधी पक्षांनी संघच देश चालवत असल्याची टीका केली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, मी स्वत: संघाच्या बैठकीस उपस्थित होतो. मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या गोपनीयतेच्या शपथेचा या बैठकीत भंग झालेला नाही. तसेच कोणत्याही खासगी कार्यक्रमात या शपथेचा भंग होणार नाही याची आम्ही काळजी घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळत असूनही आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, असा दावा करून राजनाथ सिंह म्हणाले, चीनची स्थिती काय झाली आहे ते आता जगाला समजले आहे, त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे त्यांनी नमूद केले.गुजरातमध्ये आंदोलन करण्यासाठी हार्दिक पटेल यांना संघाचाच पाठिंबा असल्याचा आरोप केला जातो, या प्रश्नाला उत्तर देणे राजनाथ यांनी टाळले तसेच दाऊदला पकडण्याबाबत वाट पाहावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) पाकच्या छुप्या कारवायांना तोंड देण्यास सैन्य सज्जपहिली गोळी आपल्याकडून जाणार नाही, मात्र समोरून गोळी आली तर नंतर आपल्या गोळ्या मोजायच्या नाहीत, असे स्पष्ट आदेश सीमेवरच्या सैनिकांना दिले आहेत. त्यामुळे पाक कितीही छुप्या कारवाया करीत असला तरीही त्याला तोंड देण्यास आपले सैन्य सज्ज आहे, असा राजनाथ सिंह म्हणाले. मानव संसाधनामध्ये भारत दुसऱ्या कंमाकावर असतानाही विकसित देशांमध्ये भारताचा समावेश नाही. मात्र केंद्र शासनाकडून देशाच्या अर्थिक विकासासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लवकरच भारतही विकसित देशाच्या पंगतीत बसेल. मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेल्या कसाब आमच्या देशातील नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र नुकतच जम्मूमध्ये दोन जिवंत दहशतवादी पकडून आम्ही पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला आहे. अमेरिकेने याबाबत पाकिस्तानला दहशतवादी कारवाया रोखण्याची ताकीद दिली आहे. मात्र आखाती देशांनी अद्यापही पाकिस्तानला अशा प्रकारे ताकिद दिलेली नाही. भारताकडे अमाप नैसर्गिक संपत्ती आहे. पण विकसित देशांमध्ये समावेश नाही. ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हुकुमत चालवली तेच याला जवाबदार आहेत.