शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

८९ वर्षांची परंपरा लाभलेला 'संघ'शिक्षा वर्ग - हेडगेवारांनी केली सुरुवात

By admin | Published: May 18, 2016 7:25 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाबाबत सामान्यांमध्ये कुतूहल असते. परंतु याच प्रकारे प्राथमिक, प्रथम व द्वितीय असे संघाचे आणखी तीन वर्ग चालतात.

८९ वर्षांची परंपरा लाभलेला 'संघ'शिक्षा वर्ग - हेडगेवारांनी केली सुरुवात : सैन्यासारखे शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्याचा होता उद्देशयोगेश पांडेनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाबाबत सामान्यांमध्ये कुतूहल असते. परंतु याच प्रकारे प्राथमिक, प्रथम व द्वितीय असे संघाचे आणखी तीन वर्ग चालतात. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर स्वयंसेवक घडावेत या दृष्टीने ८९ वर्षांअगोदर आद्य सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार यांनी या वर्गांची सुरुवात केली होती. स्वयंसेवकांना सैन्याप्रमाणे शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळावे हा डॉ.हेडगेवार यांचा मुख्य उद्देश होता हे विशेष.तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाला सोमवारपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली. अगदी उच्चविद्याविभुषितांपासून ते विद्यार्थीजीवनात असलेले स्वयंसेवक यात सहभागी झाले आहे. परंतु या संघशिक्षा वर्गांचा नेमका इतिहास फार कमी जणांना माहिती आहे.१९२५ साली ज्यावेळी संघाची स्थापना झाली तेव्हा डॉ.हेडगेवार स्वयंसेवकांना सैन्य प्रशिक्षण देऊ इच्छित होते. यामुळे स्वयंसेवकांमध्ये शिस्त आणि समूह भावना वाढीस लागते हा त्यामागचा विचार होता. डॉ. हेडगेवारांना सैन्य प्रशिक्षणाबाबत फार माहिती नसल्यामुळे त्यांनी काही माजी सैनिकांना रविवारच्या ह्यपरेडह्णमध्ये बोलविण्यास सुरुवात केली. परंतु संघ विस्तारासाठी आठवड्यातील काही तास प्रशिक्षण पुरेसे नाही असे डॉ.हेडगेवारांना वाटले व जून १९२७ पासून मोहिते वाड्याच्या मैदानात ४० दिवसीय प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. यात १७ स्वयंसेवक सहभागी झाले होते व सैन्य प्रशिक्षणासोबतच बौद्धिक कार्यक्रमांचादेखील समावेश होता. यातूनच १९२९ सालापासून नियमित संघ शिक्षा वर्गांची सुरुवात झाली. अगोदर यांना ह्यओटीसीह्ण (आॅफिसर्स ट्रेनिंग कॅम्प) असे म्हटले जायचे. १९३४ पर्यंत संघशिक्षा वर्ग नागपुरातच व्हायचे. १९३५ साली प्रथम व द्वितीय वर्ष शिक्षा वर्गाचे प्रथमच नागपूरबाहेर आयोजन करण्यात आले. पुण्यात हे आयोजन झाले होते. पाचवेळा तृतीय वर्ष वर्गात अडथळेसंघाची स्थापना होऊन ९१ वर्ष झाले आहेत. परंतु तृतीय वर्ष वर्ग प्रत्येकच वर्षी झाला असे नाही. इतिहासात पाच वेळा विविध कारणांमुळे हा वर्गच होऊ शकला नाही. १९४८, १९४९ मध्ये संघावर बंदी लावण्यात आली होती. तर आणिबाणीच्या काळात म्हणजेच १९७५ आणि १९७६ मध्ये तृतीय वर्ष शिक्षा वर्ग झाला नव्हता. डिसेंबर १९९२ मध्ये राममंदिर आंदोलनानंतर संघावर बंदी लावण्यात आली होती व १९९३ मध्येदेखील हा वर्ग होऊ शकला नव्हता. तृतीय वर्ष वर्ग नागपुरातचसंघाचे प्रथम वर्षाचे शिक्षावर्ग प्रांतनिहाय, द्वितीय वर्षाचे क्षेत्रनिहाय आणि तृतीय वर्षाचे वर्ग राष्ट्रीय स्तरावरील असतात. तृतीय वर्षाचा वर्ग हा केवळ नागपुरातच होतो. तृतीय वर्ष शिक्षा वर्ग अगोदर ४० दिवसांचा होता. त्यानंतर तो ३० दिवसांचा झाला व आता त्याचा कालावधी २५ दिवसांचा झाला आहे. तर प्रथम व द्वितीय वर्ष वर्ग २० दिवसांचे असतात. काही काळासाठी हे वर्ग अनुक्रमे १५ व २५ दिवसांचे करण्याचा प्रयोगदेखील झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षण वर्ग वर्षभर आयोजित होत असतात. परंतु उन्हाळ््याच्या सुट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त वर्ग घेण्यावर भर असतोवर्षभरात ९६१ प्राथमिक वर्गसंघाच्या प्राथमिक शिक्षा वर्गाचा कालावधी एक आठवड्यांचा असतो. २०१५-१६ मध्ये देशभरात ९६१ प्राथमिक शिक्षा वर्ग झाले व यात १ लाख १३ हजार ५२० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या वर्गात सहभाग घेतल्यानंतरच स्वयंसेवक २० दिवसांच्या संघशिक्षा वर्गात येऊ शकतात. २०१५-१६ मध्ये देशभरात ८३ संघशिक्षा वर्ग झाले. यात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष शिक्षावर्गांचा समावेश आहे, अशी माहिती विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अतुल पिंगळे यांनी दिली.