शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

सांगली : सद्भावना एकता रॅलीत 14 वर्षीय शाळकरी मुलीचा चक्कर येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 1:52 PM

या रॅली दरम्यान 14 वर्षीय शाळकरी मुलीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्या कांबळे (सांगली) असे मुलीचे नाव असून जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुख सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले आहेत.

सांगली : मकर संक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत रविवारी आयोजित केलेल्या सद्भावना एकता रॅलीनंतर ऐश्वर्या शाशिकांत कांबळे (वय १४, रा. राजवाडा चौक, सांगली) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. रॅली संपवून घरी जाताना स्टेशन चौकात चक्कर आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.जिल्हा प्रशासनातर्फे कर्मवीर चौकातून सकाळी नऊ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्यासह सांगली, मिरजेतील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शहरातील विविध मार्गावरून फिरून रॅली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेली. तिथे एकतेची शपथ दिल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.रॅली संपल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन निघाले होते. ऐश्वर्या कांबळेही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत स्टेशन चौकमार्गे घरी निघाली होती. विठ्ठल मंदिरजवळ चक्कर आल्याने ती रस्त्यावर खाली बसली. शिक्षकांनी तिच्या प्रकृतीची चौकशी केली. तिने वडिलांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. तोपर्यंत ऐश्वर्याची प्रकृती अधिकच अत्यवस्थ बनली. त्यामुळे तिला रुग्णवाहिकेमधून उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी रुग्णालयास भेट दिली. नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.दोन दिवसापासून आजारीऐश्वर्या गेल्या दोन दिवसापासून आजारी होती. तिला ताप व उलट्यांचा त्रास सुरु होता. वडिलांनी तिला शाळेला तसेच एकता रॅलीत जाऊ नकोस, असे सांगितले होते. पण तरीही ती रॅलीत सहभागी झाली होती. पण रॅली संपवून घरी जाताना तिला चक्कर आली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. तिचे कुटूंब राजवाडा चौकालगत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी वसाहतमध्ये राहते.घटना दुर्दैवीजिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, ऐश्वर्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ती गेले दोन दिवस आजारी होती. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.

टॅग्स :Sangliसांगली