शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगली : मोडी लिपीत शिवचरित्र- मोडी लिपीतील राज्यातील पहिली भित्तीपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 8:34 PM

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे सांगलीतील गरवारे कॉलेजचा उपक्रम विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे 'शिवस्मरण' छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरलेे.

सांगली : येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय आहे.

       प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला.

    प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. उर्मिला क्षीरसागर आणि मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून लिहिले. शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण, शिवकालीन अर्थकारण, शिवकालीन खेळ अशा विविध विषयावर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले. या भित्तीपत्रिकेला 'शिवस्मरण' असे समर्पक नावही देण्यात आले. 

       मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपना निंबाळकर, प्राजक्ता जाधव, स्वाती घोडके, संस्कृती पाटील, धनश्री चौगुले, अश्विनी पवार, प्रज्ञा सपकाळ, लीना पाटील, प्रतिक्षा पाटील, पद्मजा मिरजकर, वैष्णवी होनराव, फिजा शेख, स्मितल वाघमोडे, सुवर्णा मराठे, शोभा संचेती, स्वरा मराठे, तेजस्वी कांबळे, प्रतिक्षा कांबळे, अमृता कोळी, सौ. दीपाली माने, सुचित्रा गोलंगडे, सोनम मडके  यांनी  हे मोडी लिपीतील लेख लिहले. भित्तीपत्रिकेच्या उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी रांगोळी रेखाटली तीही मोडी लिपीतील अक्षरांचीच. 

   

 

 

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी