सांगली : इस्लामपूर (ता. वाळवा) येथील मानसिंग शिवाजीराव देसाई दुचाकी प्रवासातून विश्वविक्रम करणार आहेत. २४ तासांत सुमारे चोवीसशे किलोमीटर प्रवासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांच्यासोबत कोल्हापूरचे डॉ. अमरसिंह पाटील हेही हाच विश्वविक्रम स्वतंत्रपणे करणार आहेत.मानसिंग देसाई शासकीय लेखापरीक्षक आहेत. ते विटा येथे सेवेत आहेत. बेंगलोरमधील मोटारसायकलस्वाराने मार्चमध्ये २३.५८ तासात २३०८ किलोमीटर प्रवास करुन विश्वविक्रम केला होता. त्यांचे रेकॉर्ड मानसिंग देसाई व अमरसिंह पाटील मोडणार आहेत. चोवीसशे किलोमीटर अंतर २४ तासात पूर्ण करण्याचे त्यांनी लक्ष्य ठेवले आहे. ७ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता सातारा येथील सुभदा पेट्रोल पंपापासून त्यांच्या विश्वविक्रमाच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बेंगलोर (यशवंतपूरमार्गे) मार्गे अनंतपूर ते हैदराबाद असा त्यांचा प्रवास आहे. परतीचा मार्गही तसाच आहे. या विश्वविक्रमी संकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोळा लाखांचे वाहनशासकीय राजपत्रित अधिकाºयांच्या देखरेखीखाली त्यांचा विश्वविक्रम होणार आहे. ताशी ११० किलोमीटर प्रवास होईल. यासाठी साडेसोळा लाखांची अत्याधुनिक दुचाकी त्यांनी खरेदी केली आहे. बेस्ट आॅफ इंडिया रेकॉर्डस, इंडिया बुक आॅॅफ रेकॉर्ड व लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड येथे त्यांच्या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.
सांगली: दुचाकी प्रवासामधून विश्वविक्रमी संकल्प, 24 तासांत सुमारे चोवीसशे किलोमीटर प्रवासाचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 1:56 PM