शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
7
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
8
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
9
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
10
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
11
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
12
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
13
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
14
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
15
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
16
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
17
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
19
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
20
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

सांगलीत पाच लाखांचा ऐवज लंपास

By admin | Published: May 02, 2017 8:17 PM

राजेंद्र गणपतराव गंगवाणी यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दीड लाखाची रोकड असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 2 - येथील हसनी आश्रममधील राजेंद्र गणपतराव गंगवाणी यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने, दीड लाखाची रोकड असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला. ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद आहे.गव्हर्नमेंट कॉलनीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर हसनी आश्रम आहे. तिथे गंगवाणी यांचा बंगला आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता गंगवाणी कुटूंब परगावी गेले होते. बंगल्याच्या पाठीमागील बाजूस देवघर आहे. त्याला खिडकीही आहे. पण परगावी जाताना हे कुटूंब खिडकीचा दरवाजा लावण्यास विसरुन गेले. याची संधी साधून चोरट्यांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाट फोडले. त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमध्ये १२ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड होती. हा सर्व ऐवज लंपास करुन चोरट्यांनी पलायन केले. ३० एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता गंगवाणी कुटूंब परगावाहून आले. बेडरुमधील साहित्य विस्कटलेले तसेच देवघरीच्या खिडकीचा गज कापल्याचे निदर्शनास येताच त्यांना चोरीचा झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी तातडीने भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते. मात्र श्वान बंगल्याच्या परिसरातच घुटमळले. ठसे तज्ञांना महत्वाचे ठसे मिळाले आहेत. रात्री उशिरा राजेंद्र गंगवाणी यांची फिर्याद घेण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हेगारानी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. त्याद्दष्टिने तपासाची चक्रे फिरविली जात आहे.