ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 11 - विटा येथे आर्चीचे चाहते 'सैराट' झाले असतानाच चोरट्यांनी 'झिंगाट' होऊन अडीच लाखाच्या रकमेवर हात मारला.
विट्यातील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गुरुवारी आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु आली असताना चाहत्यांची गर्दी उसळली. शहरातील सगळे पोलीस बंदोबस्तात होते. हा मोका साधून चोरट्यांनी या गर्दीत एका बँक कर्मचाऱ्याकडील अडीच लाखाची पिशवी लांबवली. एका सहकारी बँकेचा हा कर्मचारी दुसऱ्या बँकेत पैसे भरण्यासाठी निघाला होता. रस्त्यावरच्या गर्दीतून वाट काढत तो निघाला होता. मात्र त्या गर्दीत चोरट्यांनी पिशवी हिसकावून लांबवली.
दरम्यान, आर्चीच्या कार्यक्रमाचे स्थळ पोलीस ठाण्याजवळच असून, चोरीची घटनाही पोलीस ठाण्याच्या दारातच घडली.