शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

संजय धोत्रेंनी निवडणूक खर्च लपविल्याचा आरोप

By admin | Published: July 03, 2015 11:44 PM

निवडणूक आयोगाकडे तक्रार; चौकशी सुरू.

अकोला: गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्टार प्रचारकांच्या खर्चापोटी खासदार संजय धोत्रे यांनी २६ लाख ९८ हजार ९२0 रुपयांचा निवडणूक खर्च लपविल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असून, यासंदर्भात निवडणूक आयोगाने २५ जून रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. एप्रिल २0१४ मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. त्यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खा. संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ भाजपच्या ह्यस्टार प्रचारकह्ण नेत्यांच्या जाहिराती आणि त्यांच्या प्रवास खर्चापोटी झालेला २६ लाख ९८ हजार ९२0 रुपयांचा खर्च खा. संजय धोत्रे यांनी त्यांच्या निवडणूक खर्चात दाखविला नाही. यासंदर्भात अकोला जिल्हय़ातील हिंगणी येथील श्रीकृष्ण महादेव अडबोल यांनी २0 मार्च २0१५ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगामार्फत अकोल्याच्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. निवडणूक आयोगाचा हा आदेश २५ जून २0१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात खा. संजय धोत्रे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ते कायद्याचा पालन करणारे आहे; निवडणूक खर्च लपविल्याबाबतचे वृत्त ह्यटीव्हीह्णवर पाहिले; मात्र याबाबत निवडणूक आयोग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नाही. तक्रारकर्त्याने अपूर्ण माहितीच्या आधारे तक्रार केली असेल; परंतू जर काही चुकीचे किंवा नियमबाह्य काम केले असेल, तर कारवाई झाली पाहीजे, असे मत व्यक्त केले.

या स्टार प्रचारकांच्या जाहिराती आणि प्रवास खर्चापोटी लपविण्यात आला खर्च!

- भाजप नेते आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती व प्रवासाचा खर्च.

- तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जाहिराती आणि हेलीकॉप्टर प्रवासाचा खर्च.

- भाजप नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहिराती आणि हेलीकॉप्टरचा प्रवास खर्च.

- भाजप नेते व विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या जाहिरातींचा खर्च.