कोल्हापूर : ‘संजय घोडावत ग्रुप’चे चेअरमन संजय घोडावत लवकरच पायलट होणार आहेत. नुकतीच ते प्रायव्हेट पायलट परीक्षा उत्तीर्ण झाले व यानंतर त्यांचे पायलट ट्रेनिंग अमेरिकेतील फ्लायिंग स्कूलमध्ये होणार आहे. ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना इंटरनॅशनल प्रायव्हेट पायलट लायसन्स मिळणार असून, स्वत:चे हेलिकॉप्टर चालविणारे घोडावत हे भारतातील तिसºया क्रमांकाचे पायलट म्हणून ओळखले जाणार आहेत. ‘पन्नाशीची उमर गाठली अजूनही मोडला नाही कणा,’ ह्या कवितेला साजेल अशी कामगिरी त्यांनी करून दाखविली आहे. घोडावत यांचे आज ५२ वर्षे वय आहे. या वयातही त्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगून ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत. कित्येक लोक पन्नाशी गाठली की आता लवकरच मी सेवानिवृत्त होणार, आता बस झाले, म्हणून उमेद मालवून घरी बसतात. त्यांच्यासाठी हे उदाहरण आदर्श ठरणारे आहे. घोडावत यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये तब्बल ३० वर्षे उत्कृष्टरीत्या त्यांच्या विविध कंपन्यांचे नेतृत्व करून यशस्वी उद्योगपतीची भूमिका पार पाडली आहे. ते स्वत: मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. उद्योग व शिक्षण क्षेत्रांत त्यांनी उभारी घेऊन आपले प्रचंड नावलौकिक मिळविले आहे. त्यांनी आज जवळपास ७,००० हून अधिक कामगारांना रोजगार पुरविला असून, ११००० हून जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी पायलट शेजारी बसून हवाई सफरीचा आस्वाद घेतला; पण आता स्वत: ते पायलट म्हणून ज्या वेळेस हवाई सफर करतील, त्यावेळचा तो आनंद त्यांच्यासाठी आल्हाददायी असेल. ‘संजय घोडावत ग्रुप’च्या माध्यमातून त्यांनी घोडावत एन्टरप्रायझेस प्रा. लि. ह्या हवाई वाहतूक कंपनीची उभारणी केली. या कंपनीकडे दोन हेलिकॉप्टर्स असून, भविष्यात ई सी १३५ व ई आर जे १३५ या दोन अद्ययावत विमानाच्या साहाय्याने हवाई वाहतुकीचा त्यांचा मानस आहे. ही त्यांची पुण्याई... परमेश्वर प्रेरणा, आई-वडील व थोरामोठ्यांचे आशीर्वाद, मित्र परिवार, ग्रुपमधील सर्व कर्मचारी वर्ग यांचे प्रेम व शुभेच्छा यामुळेच मी आजवर यशाची शिखरे पार करू शकलो. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी व ऋणी आहे, अशा भावना घोडावत यांनी व्यक्त केल्या आहेत.
संजय घोडावत प्रायव्हेट पायलट परीक्षा उत्तीर्ण
By admin | Published: November 12, 2016 12:38 AM