कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे कनिष्ठ अभियंता संजय कुलकर्णी यांच्या कामकाजाबाबत गेली अनेक वर्षे तक्रारी सुरू होत्या. याबाबत मानसिंग बाबूराव ढेरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांची चौकशी भुदरगडचे सहायक निबंधक ए. व्ही. पाटील यांनी केली. चौकशीला सामोरे जाण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. गेले दोन महिने पाटील यांनी चौकशी करून मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांना अहवाल सादर केला. यामध्ये कुलकर्णी यांच्यावर अनेक ठपके ठेवले असून त्यांनी केलेल्या कारनाम्याचा पंचनामा आजपासून...राजाराम लोंढे -- कोल्हापूर ---बाजार समितीमध्ये नोकरीस लागल्यापासून संजय कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन किमान १२ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. समितीकडे नोकरीस असताना खासगी आर्किटेक्ट म्हणून काम करणे, पत्नीच्या नावे असलेल्या ‘सुशाम एंटरप्रायजेस’ या फर्मच्या नावावर स्वत:च कोट्यवधींची कामे करणे, आदी ठपके चौकशी अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात कुलकर्णी यांच्यावर ठेवले आहेत. ांजय कुलकर्णी यांची २३ नोव्हेंबर १९८४ रोजी कनिष्ठ अभियंता म्हणून बाजार समितीत नेमणूक करण्यात आली होती. पणन मंडळाच्या निर्देशानुसार नियोजित बांधकामाचे लेआउट प्लॅन्स, सविस्तर नकाशे, अंदाजपत्रके, आर. सी. सी. डिझाईन्स तयार करणे, बांधकामावर देखरेख ठेवणे, विविध बिले तयार करणे व त्यांची शिफारस करणे, नियोजित बांधकाम लेआउटला सक्षम संस्थेची मान्यता घेऊन निविदा तयार करणे, बांधकामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी सरकारी प्रयोगशाळेतून साहित्य तपासून घेणे ही अभियंत्याची कामे आहेत; पण कुलकर्णी यांनी या उलटचा कारभार केला आहे. टेंबलाईवाडी धान्य प्रकल्पाच्या आराखड्यामधील सांडपाणी निर्गतीस गटार बांधकाम आखणी व त्याचे इस्टिमेट समिती अभियंत्याने करणे अपेक्षित होते; पण कुलकर्णी यांनी हे काम खासगी फर्मकडून करवून घेतले. अशा प्रकारची अनेक कामे आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या फर्मकडून करवून घेऊन समितीचे लाखो रुपये लुटल्याचे अहवालात म्हटले आहे. अडते, व्यापारी यांचे प्लॉटबांधणी नकाशे, फाईल बाजार समितीतून गायबही झाल्या होत्या. याबाबत सप्टेंबर २००१ मध्ये त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली होती. समितीच्या आवारातील अतिक्रमित बांधकामांबाबत त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अतिक्रमण करण्यासाठी काही ठिकाणी त्यांनीच शिफारस केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. (पूर्वार्ध)रेकॉर्ड लपविण्याचा प्रयत्न कुलकर्णी यांची फर्म कोणती व त्यांनी किती कामे केली याची मागणी चौकशी अधिकाऱ्यांनी केली होती; पण ती त्यांनी दिली तर नाहीच. तसेच बाजार समितीकडून अपेक्षित माहितीही अधिकाऱ्यांपुढे सादर केली नसल्याचे अहवालावरून स्पष्ट होते. लाखो रुपयांची बिलेच गायब!सुशाम एंटरप्रायझेसला आॅक्टोबर २००६ पर्यंत विविध कामे करून घेण्यासाठी ११ लाख ४७ हजार रुपये फी दिली आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर २००६ ला पुन्हा ३४ हजार ९७४ रुपये, तर नोव्हेंबर २००८ पर्यंत ३० हजार रुपये अशी सुमारे बारा लाख रुपये फी दिल्याचे स्पष्ट झाले आहे; पण बाजार समितीकडून ८ लाख ९१ हजार ५० रुपये अदा केल्याची बिले सादर केली आहेत. लाखो रुपयांची बिलेच उपलब्ध नसल्याचे अहवालात म्हटले आहे. कुलकर्णी यांच्यावर आतापर्यंतच्या कारवायाएप्रिल १९९५ मध्ये निलंबितसप्टेंबर २००१ मध्ये ‘कारणे दाखवा’ नोटीसजुलै २०१४ मध्ये कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाईसप्टेंबर २०१५ मध्ये चौकशीचे आदेश
बाजार समितीत संजय कुलकर्णीकडून १२ लाखांचा गैरव्यवहार
By admin | Published: December 02, 2015 1:12 AM