मुंबई : मनसेचे मालाडमधील विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मालाड पोलिसांनी याप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत. माळवदे यांच्यावर हल्ला करणाºया सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नासह काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी व मनसेचे संदीप देशपांडे यांच्याविरोधात फेरीवाल्यांना हुसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माळवदे यांना शनिवारी फेरीवाल्यांच्या जमावाने मारहाण केली होती. पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण, ठार मारण्याची धमकी, दंगल प्रकरणी गुन्हा दाखल करून यापैकी ७ जणांना अटक केली आहे. त्याच वेळी निरूपम यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मनसे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शनिवारी धक्काबुक्कीही झाली होती. या वेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडून दिले.
संजय निरूपम यांच्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:42 AM