मुंबई - अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरा निर्माणाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. असे असतानाच शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. बाबरी विध्वंसप्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा, आम्हीच बाबरी पाडली, असे भाडपा का सांगत नाही? असा सवाल राऊतांनी केला आहे. ते द इकॉनामिक टाईम्सशी बोलत होते.
द इकॉनामिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणासंदर्भात अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी, "भाजपा एक पक्ष म्हणून आणि त्यांचे वरिष्ठ नेतेही आतातरी, बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा, बाबरी मशीद आम्हीच पाडली, हे सांगण्याचे धाडस का दाखवत नाहीत?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी राऊतांनी बाबरी पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यावरही भाष्य केले. सीबीआय न्यायालयाने बाबरी पाडल्याप्रकरणी नुकतीच, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे जबाब नोंदवण्यासाठी तारीखही जाहीर केली आहे. त्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले,"आडवाणीजी आणि जोशीजी यांना या वयात सीबीआय न्यायालयात ओढले जात असताना, मला कळत नाही, केंद्र सरकार हा खटला का सुरू ठेवत आहे? हे अक्षम्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीसंदर्भात स्पष्ट निकाल दिला आहे. मग बाबरी मशीद विध्वंसप्रकरण बंद करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने कशामुळे रोखली आहे?” असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!
'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस