शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Sanjay Raut Bail: तुरुंगाबाहेर येताच संजय राऊत म्हणाले- 'आम्ही लढणारे आहोत, लढत राहू...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 7:14 PM

Sanjay Raut Bail: खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला, 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले.

Sanjay Raut Bail: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. ऑर्थर रोड कारागृहाबाहेर राऊतांची एक झलक पाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. तुरुंगाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दीगळ्यात भगवा गमछा परिधान करुन संजय राऊत ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. यावेळी, शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला होता. कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तुरुंगातून बाहेर येताच राऊत गाडीत बसले आणि उपस्थित शिवसैनिकांना नमस्कार केला. 

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रियायावेळी संजय राऊत कारमधून बाहेर आले आणि कार्यकर्त्यांची हार स्विकारले. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जुने राऊत दिसून आले. 'बाहेर आलोय, बघू आता पुढे काय होतंय. आम्ही लढणारे आहोत, लढत राहू. न्यायालयानेच माझी अटक बेकायदेशीर ठरवलीये. कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे, तिकडेच जातोय. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणारच आहे,' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

बंगल्यावर दिवाळीसारखे वातावरणईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर राऊत गेले 102 दिवस तुरुंगात होते. मात्र, आज न्यायालयातून जामीन मिळाल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संजय राऊत यांचा जामीन सण म्हणून साजरा करत आहे. शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील 'मैत्री' निवासस्थानी डीजे लावण्यात आला आहे. तसेच, बंगल्यात दसरा आणि दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे. 

उद्धव ठाकरे राऊतांची भेट घेणारसंजय राऊत यांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचू शकतात, अशी चर्चा आहे. संजय राऊत यांचे तुरुंगातून बाहेर येणे, हा सत्याचा विजय अशी प्रतिक्रिया शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत आहे. संजय राऊतच्या सुटकेनंतर ट्विटरवर टायगर इज बॅक ट्रेंड करत आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाCourtन्यायालय