गेल्या काही काळापासून संजय राऊत आणि राणे कुटुंबीयांमध्ये टीका रंगल्या आहेत. राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली की तातडीने नितेश राणे पत्रकार परिषद घेतात आणि राऊतांच्या टीकांना प्रत्तूत्तर देतात. हा वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. राऊतांनी राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
राऊतांकडून भाजपा आमदार नितेश राणेंना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली गेली असून येत्या ४ जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना कोर्टात आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. राऊतांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यावर आता भाजपाचे नेते, शिंदे गट देखील तसेच पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
नितेश राणेंविरोधात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी देखील दावा दाखल केला होता. संजय राऊतांवर किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आदीच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात टीकेचा स्तर घसरलेला असताना अशा प्रकारच्या नोटीसांची संख्या वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.