शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
2
"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
3
राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!
4
"पंथ आणि परिवारातून एकाची निवड करायची झाल्यास मी…’’, अमृतपाल सिंगचं आईला उत्तर 
5
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 
6
IND vs PAK Champions : भारताच्या विजयाची हॅटट्रिक हुकली; पाकिस्तानचा मोठा विजय, दिग्गज मैदानात
7
Hathras Stampede : २४ आश्रम, २५ वाहनांचा ताफा, १०० कोटींची संपत्ती; जाणून घ्या 'भोले बाबां'कडे नेमकं काय आहे?
8
"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं
9
"पहिल्याच नजरेत प्रेम, लग्न, घर, मुलं..."; शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा भावूक करणारा Video
10
Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
11
MS Dhoni Birthday : माहीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मध्यरात्री घरी गेला सलमान खान, धोनीसाठी केली खास पोस्ट, म्हणतो...
12
"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं
13
Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना
14
Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद
15
धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
16
लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!
17
"संघात वारंवार बदल करणे पसंत नव्हते!"; रोहितसाठी सहायकाच्या भूमिकेत असल्याचे राहुल द्रविडचे मत
18
"अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला"; राहुल गांधींचे विधान
19
डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर
20
अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल

“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 7:58 PM

Sanjay Raut News: राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.

Sanjay Raut News: राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शेतकरी मुद्द्यांवरून महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या, पीकविमा कंपन्यांकडून केली जाणारी लूट यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. यातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. हा धागा पकडून संजय राऊत यांनी राज्यात लाडका शेतकरी योजना लागू करा, अशी मागणी करत राज्य सरकारवर टीका केली आहे. 

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. आता सरकारने माझा लाडका शेतकरी योजनाही आणावी. महाराष्ट्रात रोज १० शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. जानेवारी महिन्यात राज्यात ३५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होताना दिसत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही. तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, पण त्या बहिणीचा लाडका भाऊ आत्महत्या करत आहे. राज्यामध्ये यामुळे दुःखाचे सावट निर्माण झाले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा

राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रोंबरोबर आहे. महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे, या बेवसाईटवर नोंद  झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात रोज ४ शेतकरी आत्महत्या होत आहेत, अधिवेशन काळातही या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकरी जगला तर देश जगेल म्हणूनच संकटातील शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे हित साधायचे नाही, भाजपाप्रणित शिंदे सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरीShiv Senaशिवसेना