लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : 'मला तसे बोलायचे नव्हते. कोरोना काळात डॉक्टर आणि परिचारिकांनी सर्वाधिक रुग्णसेवा केली आहे. ते तर पांढऱ्या वेशातील देवदूतच' असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. 'कोरोना काळात डॉक्टर आणि परिचारिका घाबरून पळ काढत' असे वक्तव्य केल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यावर बुधवारी राऊत यांनी सारवासारव केली.
संजय राऊत यांनी मंगळवारी वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील डॉक्टर नाराज झाले. राऊत यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आयएमएकडून देण्यात आला. त्यानंतर राऊत यांनी विधानामागील भूमिका स्पष्ट केली.