शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Sanjay Raut vs Gopichand Padalkar: "संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झालेत"; गोपीचंद पडळकरांनी केली बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:47 PM

"महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत"

महाविकास आघाडी सरकारने नुकताच एक निर्णय घेतला. त्यावरून राज्यभरात वाद सुरू आहे. वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने राज्यातील किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्येही वाईन विक्रीसाठी मंजुरी दिली. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांपेक्षा मोठं आहे, तिथे एक वेगळा स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारने मुभा दिली आहे. राज्य सरकाराच्या निर्णयावर भाजपाने टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.

"जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत फडणवीस खुलासा करतील. त्यामुळेच संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झाले आहेत. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का, की महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार असून परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना परवानगी नसेल", असा सवाल पडळकरांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांना केला.

"जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावं लागले नव्हतं ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावं लागलं. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला", असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत!

"शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात सोसलं आणि त्याची त्यांनी खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत", असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी