नाशिक: युद्धनौका INS विक्रांतच्या संवर्धन निधी संकलानवरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किरीट सोमय्या यांनी आज सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊतांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले.
'58 कोटींचा घोटाळा'आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, "देशाचा स्वाभिमान असणाऱ्या विक्रांतच्या नावावर घोटाळा झाला, राजभवनाने 58 कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केलंय. उद्या दाऊद पाकिस्तानमधून आरोप करेल, याला काय अर्थ. स्वतःची कातडी वाचविण्यासाठी हे आरोप करत आहेत," असं राऊत म्हणाले.
'हा तात्पुरता जामिनावर सुटलाय'ते पुढे म्हणतात की, "किरीट सोमय्यांना काय पुरावा पाहिजे? आम्ही पुरावा देतो. टॉयलेट घोटाळ्याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. तो फक्त ट्रेलर आहे, आता रीतसर तक्रार दाखल होणार. युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली पैसा गोळा करणे, हे दाऊदने मुबंईत बॉम्बस्फोट घडविण्यासारखा मोठा गुन्हा आहे. हा महाशय तात्पुरता जामिनावर सुटलेला आहे,'' असा टोलाही राऊतांनी लगावला.
'उत्तर प्रदेशात ओवेसी, महाराष्ट्र राज ठाकरे'"कोणी बॉम्ब फोडतो तर कोणी अर्थव्यवस्थेशी खळतो, दोन्ही एकच आहेत. तिकडे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ओवेसीकडूज जे काम करून घेतले, ते महाराष्ट्रात राज ठाकरेकडून केले जात आहे. शिवसेनेला काही फरक पडणार नाही. मुंबई, नाशिक, ठाणे, संभाजी नगर सर्व आम्ही जिंकू. काल परवा ज्यांनी हिंदुत्व स्वीकारले असे ओवेसी चालणार नाहीत बाळासाहेबाचे शिवसैनिक हे हिंदूंचे रक्षणकर्ते आहेत, असही राऊत म्हणाले.