'भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे'- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 02:35 PM2023-07-02T14:35:14+5:302023-07-02T15:56:23+5:30
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी घडामोड घडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित सत्तेत सामील होणार आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह राजभवनात दाखल झाले असून, मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले जाणार आहेत. या सर्व घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE
काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत यांनी ट्विट करत आजच्या घडामोडीवर नाराजी व्यक्त केली आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे, लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभं करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही."
भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.. https://t.co/L42b0t0Nyh
आणखी एका ट्विटमध्ये राऊत म्हणतात, "भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.''
कोणाला मंत्रिपद मिळणार?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभावनात दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपालदेखील राजभवनात आले असून, शपथविधीची संपूर्ण तयारी झाली आहे. अगदी थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार,छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे,हसन मुश्रीफ,अनिल भाईदास पाटील,आदिती तटकरे संजय बनसोडे, बाबूराव अत्राम, हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.